व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

महाराष्ट्रात ‘स्वयं गणना’ प्रक्रियेला सुरुवात; आमदार सुरेश धस यांनी भरली पहिली माहिती

0

click2ashti-देशाच्या विकासाची दिशा ठरवणाऱ्या सोळाव्या ‘भारतीय जनगणना २०२७’च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तयारीला वेग आला असून,आज (दि.१ मे) पासून राज्यात ‘स्वयं गणना’ प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे.देशाच्या इतिहासात प्रथमच नागरिकांना स्वतःची व आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाइन पोर्टलवर भरता येणार असल्याने या प्रक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
आष्टी येथे महाराष्ट्र दिनानिमित्त तहसिल कार्यालयात सकाळी ८ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याच वेळी ‘स्वयं गणना’ उपक्रमाची औपचारिक सुरुवात करत आमदार धस यांनी स्वतःची माहिती ऑनलाइन पोर्टलवर भरून या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ केला.यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर, तहसिलदार वैशाली पाटील, गटविकास अधिकारी गोकुळ बागलागे, शाखा अभियंता कृष्णा पानसंबळ, माजी पंचायत समिती सभापती बद्रीनाथ जगताप, नगराध्यक्ष जिया बेग, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे, नगरपंचायत सभापती शरिफ शेख, नगरसेवक सुरेश वारंगुळे, अक्षय धोंडे,आदिनाथ सानप, प्रविण कदम यांच्यासह पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सानप,जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,उत्तम बोडखे,प्रविण पोकळे,गणेश दळवी,विनोद ढोबळे, शरद रेडेकर आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना आमदार सुरेश धस यांनी सांगितले की, “स्वयं गणना ही डिजिटल युगातील महत्त्वाची पायरी असून नागरिकांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. यामुळे जनगणनेची प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि अचूक होणार आहे.” तसेच सर्व नागरिकांनी ऑनलाइन प्रणालीचा लाभ घेत स्वयंगणना प्रक्रियेत सहभागी व्हावे,असे आवाहन त्यांनी केले.‘स्वयं गणना’उपक्रमामुळे नागरिकांना स्वतःहून माहिती नोंदवण्याची संधी मिळणार असून शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठीही याचा मोठा फायदा होणार आहे.त्यामुळे या उपक्रमाकडे राज्यभरातून उत्सुकतेने पाहिले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.