व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

मुर्शदपूरचा नगरपंचायतीत समावेश करणार;विकासासाठी नाराजी पत्करण्यासही तयार–आ.सुरेश धस

0

click2ashti-शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर काही प्रमाणात लोकांची नाराजी पत्करावी लागते. मात्र गावाच्या विकासासाठी कोणावरही अन्याय न करता काम करण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. तरीही आष्टीच्या विकासासाठी काहींची नाराजी घ्यावी लागली, तरी मी मागे हटणार नाही. मुर्शदपूर भागाचा आष्टी नगरपंचायतीत समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले.
आष्टी शहरातील मुर्शदपूर परिसरात डी.एस. डेव्हलपर्सच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या‘माऊली अपार्टमेंट’ या वास्तूच्या भूमिपूजन व शुभारंभ समारंभात ते बोलत होते.रविवारी (दि. २१) सकाळी ११ वाजता झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किशोर हंबर्डे होते.यावेळी व्यासपीठावर डॉ.मधुकर हंबर्डे,सतीश शिंदे,खंडू जाधव,सरपंच अशोक मुळे,तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, प्रा. महेश चवरे,इंजि.दत्तात्रय देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.भाषणाच्या प्रारंभी आ.धस यांनी उपस्थितांना आंतरराष्ट्रीय योग दिन व फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या.मुर्शदपूर परिसराच्या विकासात येथील प्राध्यापक व सुशिक्षित नागरिकांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच आष्टी शहराच्या जडणघडणीत स्व. रामचंद्र धस, स्व. रघुशेठ अग्रवाल,स्व.एकनाथ शेकडे आणि स्व.के.बी.चौरे यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नियोजनबद्ध रस्ते विकास आवश्यक असल्याचे सांगत आ. धस म्हणाले,“तीस फूट रुंदीचा रस्ता तयार करणे काळाची गरज आहे. विकासकामांसाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य केल्यास प्रशासनालाही अधिक प्रोत्साहन मिळेल. भविष्यातील वाढ लक्षात घेता काही रस्ते किमान चार मीटर रुंदीचे ठेवणे आवश्यक आहे.”यावेळी त्यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत आष्टी व मुर्शदपूरकरांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर हंबर्डे यांनी मुर्शदपूर भागाचा ग्रामपंचायतीतून वगळून आष्टी नगरपंचायतीत समावेश करावा तसेच या भागाला लोकप्रतिनिधित्व मिळावे, अशी आग्रही मागणी केली.
सतीश शिंदे यांनी डी.एस. डेव्हलपर्सच्या माध्यमातून आष्टीच्या वैभवात भर पडत असल्याचे सांगितले.‘माऊली अपार्टमेंट’मुळे मुर्शदपूर परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी व्यापारी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष संजय मेहेर,डॉ.मधुकर हंबर्डे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक,प्रतिष्ठित व्यक्ती व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.