आष्टी तालुक्यात केंद्रप्रमुखांच्या नव्या नियुक्त्या जाहीर
सेवा परीक्षा प्रक्रियेनंतर ११ शिक्षकांना संधी; शैक्षणिक प्रशासनात नवचैतन्य येण्याची अपेक्षा
click2ashti-बीड जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या सेवा परीक्षा प्रक्रियेनंतर आष्टी तालुक्यातील विविध केंद्रांसाठी नव्या केंद्रप्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.गुणवत्तेला प्राधान्य देत पारदर्शक पद्धतीने झालेल्या या निवड प्रक्रियेमुळे अनेक अनुभवी व कार्यक्षम शिक्षकांना केंद्रप्रमुख म्हणून संधी मिळाली आहे.विशेष म्हणजे,नव्याने नियुक्त झालेल्या बहुतांश केंद्रप्रमुखांमध्ये तरुण व उत्साही शिक्षकांचा समावेश असल्याने तालुक्यातील शैक्षणिक प्रशासन अधिक गतिमान होईल,तसेच शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी नवचैतन्य निर्माण होईल,अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
केंद्रप्रमुख ही प्राथमिक शिक्षण व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मानली जाते.केंद्रातील सर्व शाळांचे शैक्षणिक नियोजन, शिक्षकांना मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी,शासनाच्या शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच शाळांमधील प्रशासकीय समन्वय राखण्याची महत्त्वाची जबाबदारी केंद्रप्रमुखांवर असते.त्यामुळे या पदावरील नियुक्त्यांकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.सेवा परीक्षा प्रक्रियेनंतर जाहीर झालेल्या नियुक्त्यांमुळे गुणवत्ताधिष्ठित निवड प्रक्रियेला बळ मिळाल्याचे मत शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.नव्या केंद्रप्रमुखांच्या नेतृत्वाखाली शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता,विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शिक्षकांमधील समन्वय आणि विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.
नवनियुक्त केंद्रप्रमुख
————
श्री.ज्ञानेश्वर दहिवले-खिळद
श्री.संदीप सोनवणे-कडा
श्री.बावासाहेब बनसोडे-धामणगाव
श्री.रामचंद्र रासकर-देवळाली
श्री.अमोल कदम-सावरगाव
श्री.नितीन करडुळे-खुंटेफळ
श्री.अंकुश गर्ज-पाटसरा
श्री.मच्छिंद्र सापते-पिंपळा
श्री.दीपक मोरे-दौलावडगाव
श्री.सोमनाथ वाळके-जामगाव
श्री.संजयकुमार निंबाळकर-वहाली(ता.पाटोदा)
नवनियुक्त सर्व केंद्रप्रमुखांचे शिक्षक,शिक्षणप्रेमी व विविध स्तरांतून अभिनंदन होत असून,त्यांच्या कार्यकाळात आष्टी तालुक्यातील प्राथमिक शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण,विद्यार्थी-केंद्रित व परिणामकारक होईल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.