व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

पांढरीत मध्यरात्री घरफोडी ;२.१७ लाखांचा ऐवज लंपास,दुसऱ्या घरातूनही ५० हजारांची चोरी

पोलिसांची शाळा,सोन्याची जुनी किमंत

0

click2ashti-तालुक्यातील पांढरी येथे रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा मोठा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
याबाबत महेशकुमार नानासाहेब वांढरे (वय ३३, रा. पांढरी, ता. आष्टी) यांनी आष्टी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार,१९ जुलै रोजी रात्री कुटुंबासह झोपल्यानंतर पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास त्यांचे चुलत भाऊ जयराम शेजराम वांढरे यांनी फोन करून घराच्या खालच्या मजल्याचा दरवाजा उघडा असून तीन संशयित व्यक्ती शेताच्या दिशेने पळून जाताना दिसल्याची माहिती दिली.यानंतर महेशकुमार वांढरे यांनी नातेवाईकांसह घराची पाहणी केली असता खालच्या खोलीतील सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले. बाहेरील कडी-कुलूप तसेच कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे निदर्शनास आले.चोरट्यांनी कपाटातून १ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम,सुमारे ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने, सोन्याची नथ, ७ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, तसेच चांदीच्या साखळ्या व अन्नपूर्णा देवीची चांदीची मूर्ती असा एकूण २ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार फिर्यादीने दिली आहे.याच रात्री गावातील परमेश्वर दादासाहेब हंबर्डे यांच्या घराचेही कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटातील ५० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे.एका रात्रीत दोन घरांवर डल्ला मारल्याने पांढरी गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.स्थानिक नागरिकांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करून चोरीच्या घटनांवर आळा घालण्याची मागणी केली आहे.
पोलिसांची शाळा,सोन्याची जुनी किमंत
पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोन्यांची चोरी,घरफोडी झाली तर त्यामध्ये जुने सोने असल्याचे सांगितले तर जुनी किंमत टाकुन चोरी गेलेल्या मुद्देमालाची किंमत कमी करतात त्यामुळे तपाला लय महत्व येत नाही.आणि चोरीपण छोटी झाल्याचे दाखविण्याची पोलिसांची शाळा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.