व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

मोदी सरकारला,”झुरळां”नी आणले नाकीनऊ…

0

click2ashti-गेल्या १२ वर्षांच्या कार्यकाळात एकही मोठे अंदोलन न होऊ देता विशेष म्हणजे कसलीच पत्रकार परिषद न घेता फक्त देशांच्या पंतप्रधान असलेल्या मोदी साहेबांना जेव्हा काहि मनातले बोलू वाटेल तेव्हा “मन की बात”च्या माध्यमातून देशवासीयांची इच्छा असो किंवा नसो ऐकावीच लागेल.यावरच एक तप सरकारचे काढले.पण गेल्या तीन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाने देशातील बेरोजगार तरूणांना “झुरळ” म्हणले आणि तीन महिन्यांत सर्व झुरळ एकत्र येऊन मोदी सरकारच्या नाकीनऊ आणले….
शेतकरी संघटनांपासून विरोधी पक्षांपर्यंत अनेकांनी दिल्लीत आंदोलन करून केंद्र सरकारला घेरण्याचे प्रयत्न केले. मात्र, नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात पहिल्यांदाच आंदोलक थेट संसदेवर धडकले. संसद भवनाकडे जाणारे महत्त्वाचे रस्ते तरुण-तरुणींनी व्यापून टाकल्याने पोलीस व निमलष्करी दलाला आंदोलकांना आवरता येत नसल्याने सुरक्षा व्यवस्था हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांना वारंवार अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागत होत्या.

अस्वस्थ तरूण संसदेच्या दारात..!

तरीही,आंदोलक मागे हटायला तयार नव्हते.मोदी सरकारच्या १२ वर्षांत पहिल्यांदाच संसद भवन परिसरातील आंदोलनावेळी सुरक्षा व्यवस्था निर्नायकी दिसत होती. यापूर्वी शेतकऱ्यांचे आंदोलन झाले होते, मात्र ते दिल्लीच्या वेशीबाहेर होते. या मोठ्या आंदोलनापूर्वी २०१९ मध्ये जंतरमंतरवर शेतकरी संघटनांनी दोन दिवस आंदोलन केले होते.मात्र कोणतेही आंदोलन इतके हिंसक झालेले नव्हते.संसदेकडे पोहोचणाऱ्या संसद मार्ग, रायसीना,अशोका,रफी,राजेंद्र प्रसाद,रकाबगंज,पंत आदी सहा-सात मार्ग काही किमीपर्यंत आंदोलकांनी भरून गेले होते.संसदेच्या समोरील चौकाला लागूनच सरकारी मंत्रालये असलेले शास्त्री भवन,कृषि भवन आहे. त्याच्यासमोरच रेल भवन असून त्यापलीकडे बहुचर्चित कर्तव्यपथही आहे.हा सगळा परिसर तरुण आंदोलकांनी घोषणाबाजी करून दणाणून टाकला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.