व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

तारकेश्वर गडावर अनोख्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस;गोपूजन, मानवी मनोऱ्यातून’Happy Birthday Devabhau’चा संदेश

आमदार सुरेश धस यांचा अनोखा उपक्रम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'इन्फ्रा मॅन' म्हणत दीर्घायुष्याच्या शुभेच्छा

0

click2ashti-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्या वतीने तारकेश्वर गड येथे आगळावेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्त्व अधोरेखित करत गोशाळेतील गाईंची विधिवत पूजा करण्यात आली.त्यानंतर मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी मानवी मनोऱ्याची साखळी तयार करून “Happy Birthday Devabhau” असा आकर्षक संदेश साकारत मुख्यमंत्र्यांना अनोख्या शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.या उपक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी बोलताना आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत असल्याचे सांगितले.राज्यातील पायाभूत सुविधा, उद्योग,शेती,ऊर्जा,जलसंधारण,रस्ते,दळणवळण आणि लोककल्याणकारी योजनांमुळे महाराष्ट्र देशातील आघाडीच्या राज्यांमध्ये आपले स्थान अधिक भक्कम करत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ADVT

शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा उल्लेख करताना त्यांनी वीजबिल सवलत,कर्जमाफी,घरकुल योजना, सौरऊर्जा योजना,सिंचन प्रकल्प तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील रस्ते, पूल व इतर विकासकामांसाठी राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती दिली.राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “इन्फ्रा मॅन” अशी गौरवपूर्ण उपाधी देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.राज्याच्या विकासासाठी दूरदृष्टी,अभ्यासू नेतृत्व आणि प्रभावी निर्णयक्षमतेच्या जोरावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राला नवी दिशा दिली असून, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते सातत्याने कार्यरत असल्याचेही आमदार धस यांनी नमूद केले.राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम राहावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तम आरोग्य,दीर्घायुष्य आणि यशस्वी सार्वजनिक जीवन लाभावे,अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.या आगळ्यावेगळ्या वाढदिवस सोहळ्यास विविध पदाधिकारी,कार्यकर्ते,ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गोपूजन आणि मानवी मनोऱ्यातून दिलेल्या शुभेच्छांमुळे हा उपक्रम परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.