व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आ.सुरेश धस यांच्या पाठपुराव्याने जलसिंचन उपसा योजना कार्यान्वित;लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

दुष्काळाच्या छायेत‘सिना मेहकरी’ठरली जीवनवाहिनी..!

0

click2ashti-तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून,शेतकरी व नागरिकांसमोर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे.या पार्श्वभूमीवर मेहकरी धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली सिना मेहकरी जलसिंचन उपसा योजना आमदार सुरेश धस यांच्या पाठपुराव्याने कार्यान्वित करण्यात आली आहे.त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विशेष म्हणजे,सिना धरण अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेले नसतानाही दुष्काळी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत आमदार धस यांनी योजना सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला.उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.योजना सुरू झाल्याने मेहकरी धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतीला पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून, भविष्यातील पाणी नियोजनालाही याचा फायदा होणार आहे. त्यामुळे दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.सराटे वडगावचे उपसरपंच पवन तरटे यांच्यासह परिसरातील विविध गावांतील ग्रामस्थांनी आमदार सुरेश धस यांचे आभार मानत,दुष्काळी परिस्थितीत घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले.‘शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात योजना सुरू करून मोठा आधार दिला असून,आमदार धस यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत,’अशी भावना पवनराजे तरटे यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.