व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

डॉक्टर पटवा यांच्यावर अद्यापही रुग्णालयात उपचार;पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष

अटक टळतेय की उपचार सुरूच?

0

click2ashti-कडा येथील डॉक्टर पटवा यांच्याविरोधात दाखल झालेल्या गंभीर प्रकरणानंतर पोलिसांकडून अटकेची कारवाई होणार का, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे. दरम्यान, डॉक्टर पटवा यांच्यावर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे उपचार सुरू असल्याने अटकेची कारवाई लांबणीवर पडत आहे का,असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
या प्रकरणात पोलिसांनी अटकेसाठी रुग्णालयात जाऊन कारवाई करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र, डॉक्टर पटवा यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांची प्रकृती आणि पुढील उपचार लक्षात घेता काही दिवस रुग्णालयात राहण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांना अटकेची कारवाई करण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.एकीकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस तपास सुरू आहे, तर दुसरीकडे संबंधित व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरूच असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. उपचार नेमके किती दिवस सुरू राहणार आणि उपचार पूर्ण झाल्यानंतर पोलिस तातडीने अटकेची कारवाई करणार का,याकडे आता लक्ष लागले आहे.दरम्यान, या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया आपल्या मार्गाने सुरू असून पोलिसांकडून तपासाच्या दृष्टीने आवश्यक ती कारवाई केली जात असल्याचे समजते. त्यामुळे रुग्णालयातील उपचार हा वैद्यकीय गरजेमुळे सुरू आहे की त्याचा अटकेच्या कारवाईवर परिणाम होत आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या प्रकरणामुळे कडा परिसरात आधीच संतापाचे वातावरण असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.