व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टी बसस्थानकात चालकाने घेतला गळफास,अन्सार शेख यांची जीवनयात्रा संपवली;खिशातील चिठ्ठीने खळबळ

पोलिस तपास सुरू

0

click2ashti-येथील नव्या बसस्थानकाच्या इमारतीत चालकांच्या विश्रांतीगृहात आष्टी आगारातील बसचालक अन्सार हबीब शेख (वय ४६ रा.साबलखेड) यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना आज शनिवार (दि.१२) सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.या घटनेने बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली.
अन्सार शेख हे आष्टी आगारात बसचालक म्हणून कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार,(दि.११)रोजी कर्तव्य बजावल्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास ते नव्या बसस्थानकातील चालकांच्या विश्रांतीगृहात आराम करण्यासाठी गेले होते.आज सकाळी सुमारे ७ वाजता खोलीची साफसफाई करण्यासाठी दरवाजा उघडल्यानंतर ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी आष्टी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.दरम्यान,पोलिसांच्या प्राथमिक कारवाईदरम्यान अन्सार शेख यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.त्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून तसेच ‘नाथ सर’ यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख असल्याचे समजते.मात्र,या चिठ्ठीबाबत अथवा आत्महत्येच्या नेमक्या कारणाबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.त्यामुळे या प्रकरणातील सत्यता तपासातूनच स्पष्ट होणार आहे.अन्सार शेख यांच्या पश्चात पत्नी, आई, मोठा भाऊ, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून,आष्टी आगारातील सहकारी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणाचा पुढील तपास आष्टी पोलिसांकडून सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.