व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आपण शेतमालाचा नाही तर शेतकऱ्यांच्या जगण्याच्या कसरतीचा लिलाव करतोत,लाज वाटली पाहिजे बाजारभाव करणाऱ्याला….

ग्राऊंड रिपोर्ट-सचिन रानडे ९८६०२७३३००

0

आष्टी-आज नित्यनियमाने सकाळी आष्टी शहरातील आठवडी बाजार भरायला सुरुवात झाली होती.प्रत्येक शेतकरी आपला शेतमाल बाजारहाट करण्यास आलेल्या प्रत्येकाला दिसेल अशी जागा शोधून बसत होता.दिवसभर बसायचं असल्याने आपला शेतमाल खराब होऊ नये म्हणून त्यावर सावलीसाठी कापड बांधत होता.प्रत्येकाचं निरीक्षण मी करत होतो.त्या नंतर शेतमाल विक्रीसाठी ग्राहकाची वाट बघायला सुरुवात झाली.भवानी होईल,नाही हा भाग नंतरचा तोच बाजार कमिटी घेणारा चला द्या मावशी,मामा म्हणत त्याच तो काम करत होता.
बाजारात ग्राहक म्हणून स्वतःला फार शेतमालाची जाण असल्याचा नाहक आव आणणारी काही मंडळी टोळक्याने फिरताना दिसत होती.त्यामध्ये सर्वच क्षेत्रातील होते.त्यात एक विशिष्ट वर्ग असा होता की जो काहीही घ्यायचं म्हटल तर गृपणीच खरेदी करत होता.त्या पैकी काही जण शेतकऱ्यांशी जुना कांदा आहे का नवा,मिरची हायब्रीडच दिसतीय,टोमॅटो हिरवेच कशे,बटाटा मागच्याच स्टॉक मधला दिसतोय,मेथीच्या काड्या मोठ्या आहेत,वगैरे वगैरे…अशी विचारणा करत होता.(जसे काही हे पिढ्यानपिढ्याचे शेतकरी आहेत) यातच एक जण जे घ्यायचय त्याची विचारणा करत होता याचा भाव काय,हे कस दिलं ते कस दिलं…आणि दुसरा एक जण याचे एवढे लावा,त्याचे एवढे घ्या सगळेच घेणार आहेत म्हणून भाव करत होता.आणि मग शेवटी सर्व जन मिळून त्या शेतकऱ्याचा माल मनमर्जी प्रमाणे खरेदी करत होते.मग माझ्या मनात विचार आला की ही तीच मंडळी आहे ज्यांची दैनंदिन रोजंदारी ही हजारोंच्या घरात आहे.कुणी व्यापारी आहेत,कुणी सरकारी – खाजगी नोकरी करणारे आहेत.आणि अशा लोकांनी जे आपल्याला नोकरीला लागताना मी शेतकरी पुत्र असल्याचा डांगोरा पिटवतात आणि समाजात वावरताना शेतकऱ्यांचा कनवळा असल्याचं दाखवितात.मग अशा लोकांना माझा प्रश्न आहे की,का ही लोक मग आपल्या शेतकऱ्याने काबाड कष्ट करून घाम गाळून पिकविलेला माल घेत असताना आपण त्याची कवडीमोल किंमत करतो याची थोडीशी ही लाज या बाजारहाट करणारांना असू नये.हा तोच वर्ग आहे जो मोठं मोठ्या मॉल मध्ये गेल्यावर बायकोच्या हातात पैशाने भरलेली पर्स देऊन आपण हमाल असल्या सारखं तिने घेतलेली वस्तू गुपचूप ट्रॉलीत ठेवत तिच्या मागे मागे फिरत असतो.आणि शेवटी काऊंटरवर गेल्यावर हातभर यादीचा शेवटचा आकडा पाहून बायको बील देईपर्यंत ट्रोलीतील सामान गाडीत भरतो,हा तोच वर्ग आहे जो हॉटेल वर गेल्यानंतर पाहिजे ते मागवतो खातो पितो आणि वर वेटरला टीप देतो,हा तोच वर्ग आहे जो पान टपरीवर गेल्यावर हवं ते रवंथ करत असतो…मग अशावेळी एकच गोष्ट मनाला खटकती ती ही की आपण स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून मिरवतो खर मात्र त्याच शेतकऱ्याचा शेतमाल बाजारात घेताना 2/5 रुपयांचा विचार करून त्याच्या पिकवलेल्या मालाचा भाव आपणच ठरवून मोकळे होतो.मग जर खरंच तुम्हाला भाव करायचा आहेना तर बायकोसोबत गेल्यावर मॉल मध्ये करा,हॉटेलवर गेल्यावर हॉटेल चालका बरोबर करा इतरत्र कुठेही करा मात्र तुमची अशी हिम्मत होणार नाही कारण तिथे तुमची प्रतिष्ठा (स्टेटस) असते आणि ते खराब होईल याची भीती असते.
इथे मात्र शेतकऱ्याचा माल खरेदी करताना आम्हाला या वर्गाशी कसलेच देणेघेणे नाही उलट आम्हीच आर्थिक दुर्बलतेचे बळी होत असल्यासारखे वावरतात.म्हणून शेतकरी पण तुमची किव करतो असेच आणि हेच बरोबर आहेना?मग आपण शेतमालाचा नाही तर शेतकऱ्यांच्या जगण्याच्या कसरतीचा लिलाव करतोत असे आपणास का वाटत नाही.आणि जर असे वाटत असेल तर आजपासून शपथ घ्या की शेतमालाचा भाव करणार नाही आणि शेतकऱ्या कडूनच शेतमाल खरेदी करणार म्हणून… (काही व्यापारी यात सामील आहेत जे शेतमाल आपल्या पर्यंत पोहचू देत नाहीत म्हणून शेतकऱ्याकडूनच असा शब्द जाणून बुजून वापरला आहे.)
असो….जे दिसलं ते शब्दात मांडलं…
ग्राऊंड रिपोर्ट-आष्टी आठवडी बाजार सचिन रानडे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.