आष्टीच्या पुजा धोंडे यांना राज्यस्तरीय ‘समाजभूषण पुरस्कार’
अहिल्यानगर येथे विविध क्षेत्रांतील निस्वार्थ सेवेचा गौरव;मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न
click2ashti-अहिल्यानगर येथे विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘समाजभूषण पुरस्कार’ वितरण सोहळ्यात आष्टी येथील सामाजिक कार्यकर्त्या पुजा बिभीषण देवळकर (धोंडे) यांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील निस्वार्थ सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले.या पुरस्कारामुळे आष्टी तालुक्याचा गौरव वाढला असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
रयत प्रतिष्ठान,जय युवा अकॅडमी,क्रांती ज्योती बहुद्देशीय संस्था, समृद्धी बहुउद्देशीय महिला संस्था, सावित्रीबाई फुले संस्था,श्री संत सावता माळी युवक संघ व जागृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या वेळी सन्मानित करण्यात आले.या सोहळ्यास माजी महापौर भगवान फुलसौंदर,ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे,शहर बँकेचे उपाध्यक्ष प्रा.माणिक विधाते,किशोर डागवाले,नगरसेविका आशाताई डागबाले,साहेबराव निधाने,दत्ता जाधव,मंगलताई भुजबळ,सारंग पंधाडे,मच्छिंद्र बनकर, प्रा.सिताराम जाधव,प्रा.अश्विनी जाधव,अॅड.पोपटराव बनकर, जयश्री शिंदे,स्वाती बनकर,अॅड. दिनेश शिंदे,नितीन डागवाले,दर्शन बनकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
पुजा धोंडे यांनी सामाजिक,शैक्षणिक व महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना‘समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.त्यांच्या कार्यामुळे समाजातील विविध घटकांना प्रेरणा मिळत असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान,पुजा धोंडे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आष्टी तालुक्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.