हार्ट अटॅक रोखण्यासाठी अत्याधुनिक पाऊल,आष्टीचे भुमिपुत्र डॉ.संदिप गाडे यांच्या इंम्पल्स हॉस्पिटलमध्ये १२८-स्लाइस सीटी स्कॅन मशीन सुरू
अहिल्यानगरमधील सीटी कोरोनरी अँजिओग्राफीसक्षम पहिल्या १२८-स्लाइस सीटी स्कॅन मशीनचे भव्य लोकार्पण
click2ashti-दवा आणि दुवा यांचा सुंदर संगम साधत, विज्ञानाधिष्ठित आणि मानवतावादी आरोग्यसेवेचा आदर्श उभा करणाऱ्या इम्पल्स हॉस्पिटलच्या कार्याचा गौरव करताना श्री क्षेत्र देवगड येथील पूज्य महंत श्री भास्करगिरी महाराज यांनी, “दिनदुबळ्यांसाठी दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा देणे ही खरी समाजसेवा आहे,”असे प्रतिपादन केले.
अहिल्यानगर शहरातील इंम्पल्स हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सीटी कोरोनरी अँजिओग्राफीस सक्षम १२८-स्लाइस सीटी स्कॅन मशीनचे लोकार्पण महाराजांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. अहिल्यानगरमधील हे पहिलेच १२८-स्लाइस सीटी मशीन असून ते सीटी कोरोनरी अँजिओग्राफी करण्यास सक्षम आहे,ही विशेष बाब आहे.यावेळी नगरसेवक कुमार वाकळे,सतीश शिंदे, बाळू महाराज,डॉ.काळे,डॉ.दरंदले,अमित शेटे तसेच डॉ.कानसे, डॉ.वारुडे,डॉ.विजय गाडे, डॉ.महेश घुगे,डॉ.ज्योती गाडे आणि श्री शिवाजी शिर्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात हृदयरोगतज्ज्ञ व संचालक डॉ.संदीप गाडे यांनी सांगितले की, या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे इम्पल्स हॉस्पिटलच्या आरोग्यसेवेत क्रांतिकारी बदल होणार असून,रुग्णांना अत्यंत जलद,अचूक आणि सखोल निदान मिळणार आहे.१२८-स्लाइस तंत्रज्ञानामुळे कमी वेळेत उच्च गुणवत्तेची इमेजिंग मिळून उपचार प्रक्रिया अधिक प्रभावी आणि सुरक्षित होणार आहे.या यंत्राचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सीटी कोरोनरी अँजिओग्राफी ही अत्याधुनिक तपासणी.ही पूर्णपणे नॉन-इनव्हेसिव्ह, सुरक्षित आणि रुग्णांसाठी आरामदायी पद्धत असून, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज किंवा अरुंदपणा सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखण्यास सक्षम आहे.याशिवाय,या मशीनद्वारे संपूर्ण शरीरातील विविध प्रकारच्या अँजिओग्राफी तसेच सर्व प्रकारचे सीटी स्कॅन अत्यंत अचूकतेने करता येतात, जे जुन्या तंत्रज्ञानाच्या मशीनपेक्षा अधिक प्रभावी आहे.आजच्या बदलत्या जीवनशैलीत हृदयरोग हा ‘सायलेंट किलर’ठरत असून भारतात हार्ट अटॅकचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, विशेषतः तरुण वयोगटातही त्याची तीव्रता जाणवत आहे.अशा पार्श्वभूमीवर नियमित प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक-अप ही काळाची गरज ठरत आहे.वेळेत तपासणी केल्यास हृदयविकारांसोबतच कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचेही लवकर निदान होऊन उपचार वेळेवर सुरू करता येतात.विशेषतः मधुमेह,उच्च रक्तदाब,लठ्ठपणा,धूम्रपानाची सवय,कौटुंबिक हृदयरोगाचा इतिहास असलेले,तसेच छातीत दुखणे,धाप लागणे,थकवा यांसारखी लक्षणे असलेले व्यक्तींनी सीटी कोरोनरी अँजिओग्राफीसारख्या तपासणीचा अवश्य विचार करावा,असे आवाहन डॉ.गाडे यांनी केले.इंम्पल्स हॉस्पिटलमध्ये सुमारे १०२ खाटांची सुविधा,अत्याधुनिक कार्डियाक केअर युनिट,आयसीयू,ऑपरेशन थिएटर,कॅथलॅब आणि पॅथॉलॉजी विभाग उपलब्ध असून,रुग्णांना एकाच छताखाली सर्वसमावेशक आणि उच्च दर्जाची आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न आहे.कॅथलॅब,कार्डियाक सीटी आणि हृदय शस्त्रक्रिया सुविधा यांसह इम्पल्स हॉस्पिटल आता हार्ट अटॅकसारख्या गंभीर आजारांवर तातडीने उपचार करून जीव वाचविणारे ‘स्टेट-ऑफ-द-आर्ट’केंद्र म्हणून विकसित झाले आहे.“आधुनिक तंत्रज्ञान,अचूक निदान आणि संवेदनशील सेवा” या तत्त्वांवर आधारित इम्पल्स हॉस्पिटल भविष्यातही रुग्णसेवेत नवे मानदंड निर्माण करत राहील,असा विश्वास हृदयरोगतज्ज्ञ व संचालक डॉ.संदीप गाडे यांनी व्यक्त केला.