धनश्री पतसंस्थेचा 60 लाखांचा दमदार नफा; 87.92 कोटींचा भक्कम व्यवसाय
अध्यक्ष रंगनाथ धोंडे यांची माहिती
click2ashti-गेल्या तब्बल सहाव्वीस वर्षांची परंपरा जपत ३१ मार्चलाच ताळेबंद सादर करणाऱ्या आष्टी येथील धनश्री पतसंस्थेने यंदाही आपली आर्थिक कामगिरी जाहीर केली असून सन २०२५-२६ अखेरीस संस्थेला ६० लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. ही माहिती संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ धोंडे यांनी दिली.

आष्टी येथील पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ताळेबंद सादर करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष लक्ष्मण सुरतवाले, सचिव जितेंद्र शिंदे,कडा शाखेचे शाखाधिकारी रमेश बोराडे यांच्यासह संचालक मंडळ व अधिकारी उपस्थित होते.अध्यक्ष धोंडे पुढे म्हणाले की, सन २०२५-२६ अखेरीस संस्थेचा एकूण व्यवसाय ८७ कोटी ९२ लाख १४ हजार २५४ रुपयांवर पोहोचला आहे. यामध्ये ४८ कोटी ५८ लाख ५२ हजार २१२ रुपयांच्या ठेवी,३९ कोटी ३३ लाख ६२ हजार ४२ रुपयांचे कर्जवाटप, तसेच १८ कोटी ६५ लाख ४६ हजार ७६७ रुपयांची गुंतवणूक समाविष्ट आहे. संस्थेचा स्वनिधी ५ कोटी ३८ लाख २७ हजार ४९७ रुपयांपर्यंत पोहोचला असून या भक्कम आर्थिक पायावर संस्थेला यावर्षी ६० लाख रुपयांचा नफा मिळाला आहे.गेल्या २६ वर्षांत धनश्री पतसंस्थेने केवळ आर्थिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपत शहरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. विशेषतः वृक्षलागवड व संवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणातही संस्थेने उल्लेखनीय योगदान दिले असल्याचे धोंडे यांनी सांगितले.
“गेल्या सहावीस वर्षांपासून आम्ही ३१ मार्चलाच ताळेबंद सादर करण्याची परंपरा जपली आहे.आमच्या संस्थेची थकबाकी २%, एनपीए ३%,सिडी रेशो ६८% तर सीआरएआर २८% असा आहे.या संस्थेच्या वाटचालीस ठेवीदार, कर्जदार व सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाच्या बळावरच संस्थेची ही प्रगती शक्य झाली.”
-जितेंद्र शिंदे,सचिव,धनश्री पतसंस्था, आष्टी