व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

“झुराळा”समोर “सरकार”झुकले; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

0

click2ashti-नीट पेपरफुटीसाठी त्यांना जबाबदार धरत जंतर मंतरवर ३६ दिवसांपासून आंदोलन सुरू होते.धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आम्ही दुसरे काहीही स्वीकारणार नाही, असे आंदोलकांनी म्हटले होते.आज केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने अखेर “झुराळा”समोर “सरकार”झुकले अन् लोकशाही जिंकली यावरून दिसून आले.
प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल दीपक म्हणाले, “लोक म्हणायचे की या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत. झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए.” दीपक म्हणाले, “धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे.जर तुम्ही घाबरत नसाल, जर तुम्ही या सरकारपुढे झुकत नसाल,तर तुम्ही कोणाचाही राजीनामा घेऊ शकता, याचा हा पुरावा आहे. लोकशाहीत घाबरण्याची गरज नाही.”धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः आपल्या पोस्टमध्ये एक पत्र प्रसिद्ध करून आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.
सीजेपीने म्हटले, “कॉकरोच जिंकले.. लोकशाही जिंकली”
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पक्षाने(सीजेपी) प्रतिक्रिया दिली आहे.’कॉकरोच जिंकले,लोकशाही जिंकली’असे सांगणारे एक निवेदन पक्षाने प्रसिद्ध केले आहे.प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हा पक्ष गेल्या ३६ दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तिथे उपोषण केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.