मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
click2ashti-मराठा समाजाच्या विविध सामाजिक उपक्रमांना चालना देत मराठा योद्धा, क्रांतीतीर्थ मा.श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सकल मराठा समाज,आष्टी तालुका यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील रक्तदान शिबिर दि. १ ऑगस्ट २०२६ (शनिवार) रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत नगरपंचायत कार्यालय,आष्टी येथे आयोजित करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदानाचा महायज्ञ यशस्वी करावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रक्तदान हे सर्वोत्तम दान मानले जाते. एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते.समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून युवकांनी या सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र तसेच आकर्षक जॅकेट भेट देण्यात येणार आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या रक्तदान शिबिरात आष्टी तालुक्यासह परिसरातील नागरिक,युवक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.