व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याविरोधातील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तीव्र निषेध;संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

0

click2ashti-महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ना.सुनेत्राताई पवार यांच्याविषयी काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर (एक्स) हँडलवर करण्यात आल्याचा आरोप असलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.या प्रकरणातील संबंधितांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी तहसीलदार वैशाली पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला आणि महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचविणारे वक्तव्य करण्यात आल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. महिलांचा सन्मान अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या वक्तव्यांना आळा घालणे आवश्यक असून, संबंधितांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तसेच काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून करण्यात आल्याचा आरोप असलेले संबंधित पोस्ट तात्काळ हटविण्यात यावे, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या आक्षेपार्ह आणि महिलांचा अवमान करणाऱ्या पोस्ट प्रसिद्ध होणार नाहीत, याची दक्षता घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.याशिवाय,महिलांचा अपमान करणाऱ्या व्यक्तींविरोधात भारतीय न्यायसंहितेतील संबंधित तरतुदींनुसार गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.सदर निवेदन तहसीलदार,आष्टी यांना सादर करण्यात आले असून,संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर युवानेते डॉ.अजय धोंडे,यश आजबे,काकासाहेब शिंदे,
भाऊसाहेब घुले,बाळासाहेब शिंदे,सदाशिव दिंडे,नाजिम शेख यांच्यासह आदि कार्यकर्तेच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.