व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

कडा येथील पटवा हॉस्पिटलच्या डॉ.महेंद्र पटवाचा १९ वर्षीय तरुणीवर विनयभंग;आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल

उपचारासाठी गेलेल्या तरुणीला केबिनमध्ये बोलावून गैरवर्तन केल्याची फिर्याद;डॉक्टर महेंद्र पटवा यांच्याविरुद्ध BNS च्या कलमांनुसार कारवाई

0

click2ashti-कडा येथील पटवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणीने डॉक्टरने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप केला आहे.या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात डॉक्टर महेंद्र पटवा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम ७४,७५(१) आणि ३५१(२)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे कडा परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार,संबंधित तरुणी कडा येथील म्हेत्रे वस्ती परिसरातील रहिवासी असून तिचे वय १९ वर्षे आहे.ती व्यावसायिक शिक्षण घेत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.(दि.२९) ऑगस्ट २०२६ रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ती आई-वडिलांसोबत पटवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली होती.त्यावेळी तिला सलाईन,इंजेक्शन आदी उपचार करण्यात आले.
यानंतर (दि.३०) ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा त्रास सुरू झाल्याने ती आई-वडिलांसोबत पटवा हॉस्पिटलमध्ये गेली.डॉक्टरांनी तपासणी करून सलाईन लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
केबिनमध्ये बोलावून गैरवर्तन केल्याचा आरोप
फिर्यादीत केलेल्या आरोपानुसार,उपचार सुरू असताना डॉक्टरांनी संबंधित तरुणीला काही कारण सांगून केबिनमध्ये बोलावले.त्यानंतर तिच्या आईला बाहेर जाण्यास सांगून केबिनचा दरवाजा बंद केला. यावेळी डॉक्टरांनी तिच्याशी अश्लील स्वरूपाचे बोलणे करून तिच्या इच्छेविरुद्ध शरीराला स्पर्श केल्याचा गंभीर आरोप तरुणीने केला आहे.
तरुणीने विरोध केला असता डॉक्टरांनी तिला बाहेर कोणाला काही सांगू नकोस,अन्यथा तुझी बदनामी होईल,अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तेथून बाहेर येत घरी गेल्यानंतर आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केले आहे.
दुसऱ्या दिवशी पोलिसांत तक्रार
घडलेल्या प्रकारानंतर ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तरुणीने आष्टी पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी FIR क्रमांक ०३८७/२०२६ दाखल केला आहे.FIR मध्ये घटनेची वेळ ३० ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते १०.४० अशी नमूद करण्यात आली आहे.या प्रकरणात डॉक्टर महेंद्र पटवा,पटवा हॉस्पिटल,कडा यांचे नाव संशयित/आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४,७५(१) व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून,पुढील तपास आष्टी पोलिसांकडून सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.