व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या अटकेसाठी ग्रामस्थांचे निवेदन; चार दिवसांत अटक न झाल्यास गाव बंदचा इशारा

0

click2ashti-विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी डॉ.महेद्र पटवा यांना तात्काळ अटक करण्यात यावी,या मागणीसाठी कडा परिसरातील ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाला निवेदन दिले आहे. आरोपीला अटक न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की,डॉ.महेंद्र पटवा यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संबंधित आरोपी सध्या उपचाराच्या नावाखाली रुग्णालयात दाखल असून,अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.आरोपीची जामीन याचिका तीन वेळा न्यायालयाने फेटाळल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.आरोपी रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली दाखल असून तेथे विविध सुविधा घेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.यापूर्वीही ४ सप्टेंबर २०२६ रोजी संवैधानिक पद्धतीने निवेदन देऊन आरोपीच्या अटकेची मागणी करण्यात आली होती.मात्र,अद्याप अटकेची कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.मुलीवर झालेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर संबंधित आरोपीला तात्काळ अटक करावी,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आरोपीला अटक न झाल्यास शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील,असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान,निवेदनाच्या शेवटी चार दिवसांत आरोपीला अटक न केल्यास गाव बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.त्यामुळे या प्रकरणात पोलीस प्रशासन आता काय भूमिका घेते,याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.