‘यह लचांड मेरे तरफ कैसे आया,मैं तो पागलच हुआ!’–मनोज जरांगे
पाचशे कोटींच्या आरोपाने राज्याच्या राजकारणात खळबळ; व्हिडिओ क्लिप दाखवत जरांगेंचा सरकारवर निशाणा
click2ashti-नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या एका गंभीर आरोपामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आपल्या नावाने बदनामी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचशे कोटी रुपये घेतल्याचा आरोप जरांगे यांनी केला. या आरोपांनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पुरावे असतील तर ते संबंधित यंत्रणेकडे सादर करावेत, असे आव्हानही त्यांनी दिले.दरम्यान,जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत थेट व्हिडिओ क्लिपचा उल्लेख करत सरकारवर निशाणा साधला आणि आपल्याविरुद्ध सुरू असलेले कथित षडयंत्र थांबवावे,असा इशारा दिला.
नारायणगडावरील दसरा मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या नावाचा वापर करून बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. या प्रकरणात पाचशे कोटी रुपयांचा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय संघर्षाला धार मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.जरांगे पाटील यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोप स्पष्टपणे फेटाळले. आरोप करायचे असतील तर त्यासोबत ठोस पुरावेही द्यावेत आणि संबंधित यंत्रणेकडे तक्रार करावी,अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे या प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.
व्हिडिओ क्लिप दाखवत जरांगेंचा सवाल
या संपूर्ण प्रकरणावर पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करताना मनोज जरांगे पाटील यांनी एका व्हिडिओ क्लिपचा उल्लेख केला.‘यह लंचाड मेरे तरफ कैसे आया,मैं तो पागलच हुआ,’ असे म्हणत त्यांनी आपल्यासंदर्भात समोर येणाऱ्या बाबींवर प्रश्न उपस्थित केले. या वक्तव्याच्या माध्यमातून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आपल्याविरुद्ध सुरू असल्याचे कथित षडयंत्र थांबवावे, असा थेट इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. आपल्याला विनाकारण वादात ओढून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर तो सहन केला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.
आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले
एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचे गंभीर आरोप,तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले खंडन,यामुळे या प्रकरणाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये नेमके काय आहे,तिचा संदर्भ काय आहे आणि जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांना कोणते पुरावे आहेत,याबाबत अधिकृतरीत्या स्पष्टता येणे महत्त्वाचे ठरणार आहे.सध्या या प्रकरणातील आरोप आणि त्यावरील प्रतिक्रिया यांवरून राजकीय चर्चांना वेग आला आहे.संबंधित व्हिडिओ क्लिपची सत्यता,त्यातील वक्तव्यांचा संदर्भ आणि आरोपांमागील वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके चित्र समोर येऊ शकेल.त्यामुळे आता या आरोपांवर राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणा काय भूमिका घेतात,याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सोबत व्हिडिओ-