व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

अठरा वर्षांच्या सत्तेला पदवीधरांचा ‘सच’ कौल; सतीश चव्हाण यांचा पराभव!

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा दणदणीत विजय; प्रस्थापितांना मतदारांनी दाखविली जागा

0

click2ashti-मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विजय मिळवत प्रस्थापित राजकीय नेते आणि संस्थात्मक ताकदीला धक्का दिला आहे. गेल्या अठरा वर्षांपासून सत्तेत असलेल्या सतीश चव्हाण यांना पदवीधर मतदारांनी नाकारल्याने या निकालाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आठ जिल्हे आणि ७६ तालुक्यांत केलेले सूक्ष्म नियोजन, कार्यकर्त्यांची एकजूट आणि पदवीधरांच्या प्रश्नांवर केंद्रित प्रचार विजयासाठी महत्त्वाचा ठरल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
पदवीधरांचे आर्थिक स्थैर्य, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार, तसेच मराठवाड्यात स्टार्टअप्स आणि उद्योगांना चालना देण्याचा कृती आराखडा मतदारांसमोर मांडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मतदारांना गृहीत धरणाऱ्या प्रस्थापितांना या निकालातून धडा मिळाला असून,हा सुशिक्षित पदवीधरांच्या स्वाभिमानाचा विजय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.डॉ.पाटील यांच्या विजयाचे वृत्त समोर येताच मतमोजणी केंद्राबाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.