click2ashti update-जामखेड शहरातील बसस्थानकासमोर असलेल्या कोमल आॅटो सेंटरला गुरूवार दि.२३ रोजी दुपारी २ च्या सुमारास अचानक आग लागली.अचानक लागलेल्या आगीला तात्काळ आटोक्यात आणण्यात यश आले असून,या आगीत लाखो रूपायांचे नुकसान झाले असल्याची प्राथामिक माहिती समोर येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी जामखेड शहरात माजी सरपंच तथा व्यापारी सुनिल कोठारी यांचे कोमल आॅटो सेंटर आहे.आज गुरूवार दि.२३ रोजी दुपारी २ च्या सुमारास आॅटो सेंटरच्या पाठिमागील भागात (गोडावून)मध्ये अचानक आग लागली.ही आग एवढी प्रचंड होती की कोणालाच जवळ जाता येत नव्हते आणि आगही आटोक्यातही आणता येत नव्हती.सुमारे पंधरा ते वीस मिनिटात जामखेड नगर परिषदच्या आग्नीशामक दलाने व नागरीकांनी आग आटोक्यात आणली.

माञ या आगीत लाखो रूपायांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत असून,हि आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण माञ समजू शकले नाही.
