धनगर आरक्षणविरोधात नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी
मुंबई click2ashti राज्यात आरक्षणाचा वनवा पेटला असून धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. धनगर समाजाने एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अिजत पवार गटाचे आमदा नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी मारली. मात्र मंत्रालयाच्या संरक्षक जाळीमुळे ते बचावले.

धनगर समाजाने एसटी प्रवर्गात आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. धनगर समाजाने आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी अनुसूचित जमाती अर्थात एसटीचे आरक्षण देण्याची मागणी केली आहे. याला नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर यांच्यासह आिदवासी आमदारांनी विरोध केला आहे. धनगर समाजाच्या मागण्यांबाबत महायुती सरकार सकारात्मक असल्याचे लक्षात आल्यानंतर झिरवाळ यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र बैठकीत योग्य चर्चा न झाल्याने आमदार नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. मंत्रालयात लावलेल्या संरक्षक जाळीमुळे दोघेही बचावले.