आष्टी तालुक्यात भीषण अपघात;माय,लेकराचा होरपळून मृत्यू
click2ashti-तालुक्यातील कापसी फाटा येथे हायवा (डंपर)व चारचाकी वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात चारचाकी गाडी पेटली आणि जळून खाक झाली. या दुर्घटनेत ऋषिकेश श्रीहरी पुरी (वय-२६),पुष्पा श्रीहरी पुरी(वय-५०)या माय-लेकरांचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,आष्टी तालुक्यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले ह.भ.प.श्रीहरी पुरी यांचे मुळ गाव साळेगांव ता.केज हे असून आज शुक्रवार (दि.२७) रोजी सकाळी आष्टी येथून आपल्या मालकीची शिफ्ट डिझायर ही गाडी घेऊन त्यांची पत्नी व मुलगा गावी पाहुण्यांच्या १३ व्या च्या विधीसाठी निघाले होते.आष्टी डोईठाण-अंमळनेर मार्गी बीडकडे जात असतांना कापशी फाटा येथे समोरून खडी ने भरलेले टिप्पर क्रं.एम-१६ सीडी-७३०५ या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने शिफ्ट डिझायर गाडीने पेट घेतला यामध्ये मुलगा ॠषीकेश व आई पुष्पा यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.रुग्णवाहिका,पोलीस व अग्निशामक गाडी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ग्रामस्थ व प्रवाशांनी त्यांना अपघातातून वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र त्यांना वाचविण्यत यश आले नाही.
