जून महिना अर्धा लोटला,टँकरची मागणी वाढली;पाऊस मात्र बेपत्ता
सहा गावात टॅकर सुरू;सात गावांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजूरी साठी पाठविले
गणेश दळवी|आष्टी-जून महिना अर्थ योटला मात्र अद्याप यंदा सुपर अलनीनोच्या प्रभावामुळे पावसाळा अनियमीत राहुन पाऊसही सरासरीच्या कमी होणार असल्याचे सांगण्यात आले होते.त्यात आता या महिन्याच्या शेवटी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे पाणी टंचाईची तीव्रता वाढुन पाण्यासाठी सुरू असलेल्या टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.त्याचा परिणाम होऊन जून महिन्यातही तालुक्यात ६ गावांमध्ये प्रस्ताव मंजूर झाले असून आष्टीसह सात गावचे टॅकर मागणीचे प्रस्ताव मंजूरी साठी पाठविले असल्याची माहिती तहसिलदार वैशाली पाटील यांनी दिली.
यंदा संपूर्ण देशावर सुपर अलनीनोचे संकट घोंघावत आहे. त्यात पावसाळा जून महिन्यामध्ये सुरू न होता पहिल्याच महिन्यात सरासरी पेक्षा पावसाची मोठी तूट जाणवणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याचा प्रत्यय सर्वांना जून महिन्यात आला आहे.जून महिन्याचे सुरूवातीचे २० दिवस लोटले असताना जिल्ह्यात काही भागात झालेल्या तुरळक पावसापेक्षा कुठेही जोरदार पाऊस बरसलेला नाही.दरवर्षी जून महिन्यात बरसणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ २० टक्के पाऊस झाला असल्याची नोंद आहे.या रखडलेल्या पावसाचा परिणाम होवून शेतातील पेरण्या रखडल्या आहेत.इतकेच नव्हे तर पाऊस न आल्याने तापमानामध्ये झालेली वाढ कायम आहे. उन्हाची दाहकता नागरिकांना त्रस्त करीत आहे.पाऊस न आल्याने जलाशयांमधील पाण्याची पातळी कमालीची घटली असून जून महिन्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी उपाययोजना
करण्यात येत आहे.दरदिवशी पाण्याचे टॅकरची मागणी वाढत चाललेली आहे.सध्या तालुक्यात बावी,कापशी,खरडगव्हाण, केरुळ,कोहीणी,किन्ही या सहा गावांतील ५६६१ नागरीकांची तहान हे पाच टॅकर भागविणार आहेत.

दरम्यान जून महिन्याच्या अखेपर्यंत जिल्ह्यात पाऊस येण्याची शक्यता पावसाकडे लागले सर्वांचे लक्ष,पेरणीवर परिणाम हवामान विभागाने सातत्याने यंदा मान्सुन लवकर बरसणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यातच जून महिन्याची २० तारीख आली.असे असताना अद्यापपर्यंत मान्सुनचा पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे आता पावसाची सुरूवात कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चांगला पाऊस आल्याशिवाय पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली निघणार नसल्याने आता प्रशासनही पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसते. जलजीवन मिशनच्या माध्यमातून तालुक्यात ७० पेक्षा गावात पाणी पुरवठ्याच्या योजनांचे काम सुरू करण्यात आले होते.मात्र अनेक कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत.त्याचा फटका बसून पाणी टंचाईची झळ अनेक गावांना बसत आहे.ही परिस्थिती चिंताजनक आहे.
या गावचे प्रस्ताव मंजूरी साठी पाठविले
वाहिरा,बीडसांगवी,आष्टा(ह.ना.),नगर पंचायत आष्टी,जामगांव,देवीगव्हाण व मुर्शदपुर या सात गावची स्थळ पाहणी करुन या गावचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजूरी साठी पाठविले आहेत.
–वैशाली पाटील,तहसिलदार आष्टी
सुपर अलनीनोचा फटका
हिंद महासागरात निर्माण झालेल्या सुपर अलनीनो चक्रीवादळामुळे संपुर्ण देशातच मान्सुनवर परिणात जाणवत आहे.असे असताना राज्यातील सर्वात कमी पाऊस बरसणाऱ्या जिल्ह्यांमध्ये बीड जिल्हाचा समावेश राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.त्यानुसार या सुपर अलनीनोचा फटका आतापासूनच बसत आहे.