व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

बीड-पुणे रेल्वेमुळे आष्टीकरांसाठी मुंबई प्रवासही झाला सोपा!

रात्री न्यू आष्टीहून प्रवास सुरू; पहाटे पुणे अन् सकाळी मुंबई CSMT-कनेक्टिंग रेल्वेमुळे आष्टी ते मुंबई अवघ्या १० तास ५२ मिनिटांत

0

click2ashti-बीड-पुणे दैनंदिन एक्स्प्रेस रेल्वेसेवा सुरू झाल्यामुळे आष्टीसह परिसरातील नागरिकांच्या रेल्वे प्रवासाला नवे दालन खुले झाले आहे.पुण्यापर्यंत थेट रेल्वेची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर आता पुणे येथून मुंबईकडे जाणाऱ्या विविध रेल्वेंची जोडणी साधता येत असल्याने आष्टीकरांसाठी मुंबई प्रवासही अधिक सोयीचा आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.
न्यू आष्टी रेल्वे स्थानकावरून बीड-पुणे एक्स्प्रेस (गाडी क्र. 11434) रात्री 11 वाजून 3 मिनिटांनी सुटते आणि पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी पुणे जंक्शनला पोहोचते. ही सेवा दररोज सुरू आहे.
यानंतर पुणे जंक्शनवरून मुंबई CSMTकडे जाणाऱ्या सकाळच्या रेल्वेंचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध होतो. त्यामध्ये सिंहगड एक्स्प्रेस (11010) सकाळी 6:05 वाजता पुण्याहून सुटून 9:55 वाजता मुंबई CSMTला पोहोचते. त्यामुळे न्यू आष्टीहून रात्री सुरू केलेला प्रवास सकाळी मुंबईत पूर्ण करता येतो.
आष्टीकरांचा पुणे–मुंबई रेल्वे कनेक्शन

पहिला पर्यायसिंहगड एक्स्प्रेस
न्यू आष्टी : रात्री 11:03
पुणे जंक्शन : पहाटे 5:20
पुण्यात पुढील रेल्वेसाठी प्रतीक्षा-सुमारे 45 मिनिटे
सिंहगड एक्स्प्रेस क्र.11010 : सकाळी 6:05
मुंबई CSMT : सकाळी 9:55
एकूण प्रवास : सुमारे 10 तास 52 मिनिटे.
दुसरा पर्याय-डेक्कन क्वीन
पुणे जंक्शनहून डेक्कन क्वीन क्र. 12124 सकाळी 7:15 वाजता सुटते आणि मुंबई CSMTला 10:25 वाजता पोहोचते. या पर्यायात न्यू आष्टीहून पुण्याला पोहोचल्यानंतर सुमारे 1 तास 55 मिनिटांचा वेळ उपलब्ध होतो.
तिसरा पर्याय–प्रगती एक्स्प्रेस
पुणे जंक्शनहून प्रगती एक्स्प्रेस क्र. 12126 सकाळी 7:45 वाजता सुटते आणि मुंबई CSMTला 11:25 वाजता पोहोचते.
चौथा पर्याय–मुंबई वंदे भारत
वंदे भारत एक्स्प्रेस क्र. 22226 पुणे जंक्शनवरून सकाळी 9:15 वाजता सुटते आणि मुंबई CSMTला दुपारी 12:35 वाजता पोहोचते.
थेट मुंबई रेल्वे नसली तरी कनेक्टिंग रेल्वेमुळे मोठी सोय
न्यू आष्टी ते मुंबई अशी थेट रेल्वे सेवा सध्या उपलब्ध नसली तरी बीड-पुणे एक्स्प्रेस आणि पुणे–मुंबई रेल्वेसेवा यांची वेळ साधून प्रवास केल्यास मुंबई गाठण्याचा प्रभावी पर्याय उपलब्ध झाला आहे. विशेषतः रात्री प्रवास सुरू करून सकाळी मुंबईत पोहोचण्याची सुविधा विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, रुग्ण, नातेवाईक तसेच विविध कामानिमित्त मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी उपयुक्त ठरू शकते.आष्टी परिसराला पुणे आणि मुंबईसारख्या प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या या रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे शिक्षण, रोजगार, व्यवसाय, वैद्यकीय उपचार आणि अन्य कामांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या वेळेत मोठी बचत होण्याची शक्यता आहे.
न्यू आष्टी ते मुंबई—रात्री प्रवास, सकाळी मुंबई!
न्यू आष्टीहून रात्री 11:03 वाजता सुरू झालेला रेल्वे प्रवास पहाटे 5:20 वाजता पुण्यात पोहोचतो. त्यानंतर सकाळच्या उपलब्ध रेल्वेने मुंबईकडे रवाना होता येते. सिंहगड एक्स्प्रेसचा पर्याय निवडल्यास सकाळी 9:55 वाजता मुंबई CSMT गाठता येते. म्हणजेच न्यू आष्टी ते मुंबई CSMTचा रेल्वे प्रवास सुमारे 10 तास 52 मिनिटांत पूर्ण करण्याचा पर्याय आष्टीकरांना उपलब्ध झाला आहे.बीड-पुणे रेल्वेसेवेमुळे केवळ पुण्याची दारेच खुली झाली नसून,पुणे मार्गे मुंबईशीही आष्टीची रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक जवळ आली आहे,ही आष्टीकरांसाठी निश्चितच महत्त्वाची बाब ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.