व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

महावितरणच्या आष्टी उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंता पदी राहुल जायभाय यांची नियुक्ती

यापूर्वी शाखा अभियंता म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामाचा अनुभव; वीजसेवा अधिक सक्षम करण्याचा निर्धार

0

click2ashti-महावितरणच्या आष्टी उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंता पदाचा पदभार राहुल जायभाय यांनी नुकताच स्वीकारला आहे.यापूर्वी त्यांनी आष्टी येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत राहून ग्राहकाभिमुख कामकाज,तांत्रिक अडचणींचे तत्पर निराकरण आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उल्लेखनीय काम केले होते.त्यामुळे त्यांची पुन्हा आष्टी येथे नियुक्ती झाल्याने नागरिक,वीजग्राहक तसेच महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
राहुल जायभाय यांनी आपल्या सेवाकाळात वीज वितरण व्यवस्थेतील सुधारणा,तांत्रिक बिघाडांचे तातडीने निराकरण, ग्राहकांच्या तक्रारींना तत्पर प्रतिसाद तसेच शहरी आणि ग्रामीण भागातील वीजपुरवठा अधिक विश्वासार्ह करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.त्यांच्या कार्यपद्धतीमुळे महावितरणच्या सेवेत अधिक कार्यक्षमता आणि पारदर्शकता दिसून आली होती.उपकार्यकारी अभियंता म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आष्टी उपविभागातील वीजपुरवठा अधिक सक्षम करणे,देखभाल-दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करणे,ग्राहकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे,वीजचोरी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे तसेच थकीत वीजबिल वसुलीसह महावितरणच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.ग्रामीण भागातील शेतीपंपधारक, घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयातून काम करण्याचा निर्धार राहुल जायभाय यांनी व्यक्त केला आहे.त्यांच्या नियुक्तीमुळे आष्टी उपविभागातील वीजसेवा अधिक गतिमान होईल,ग्राहकांच्या समस्या जलदगतीने मार्गी लागतील आणि महावितरणच्या विकासकामांना नवी दिशा मिळेल,असा विश्वास विविध स्तरातून व्यक्त केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.