व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीच्या विकासकामांना गती;आ.सुरेश धस यांचा प्रशासनाला स्पष्ट निर्देश

पुनर्वसन,शिक्षण,ग्रामीण विकास व पशुसंवर्धनासह विविध विषयांवर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक

0

click2ashti-आष्टी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी गुरुवारी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या.जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत पुनर्वसन,शिक्षण,ग्रामीण विकास,पशुसंवर्धन आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेऊन विकासकामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात उपसा सिंचन योजना क्रमांक ३ अंतर्गत खुंटेफळ व कुंभेफळ गावांच्या पुनर्वसन प्रक्रियेचा आढावा घेत प्रकल्पग्रस्तांना न्याय्य भरपाई,पारदर्शकता आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण सुनिश्चित करण्याबाबत आ.धस यांनी प्रशासनाला निर्देश दिले.
जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद शाळांसाठी नवीन वर्गखोल्यांना निधी,१० शाळांमध्ये अत्याधुनिक रोबोटिक्स लॅब उभारणे,पशुसंवर्धन विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर उत्कृष्ट जनुकीय वळूंचे बीज उपलब्ध करून देणे तसेच रोजगार हमी योजनेतून शाळांच्या वर्गखोल्यांची उभारणी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.आष्टी मतदारसंघातील विकासकामांना गती देणे, ग्रामीण शिक्षण अधिक सक्षम करणे आणि शेतकरी व प्रकल्पग्रस्तांच्या हिताच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनासोबत सातत्याने समन्वय ठेवून काम सुरू असल्याचे आमदार सुरेश धस यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.