व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराच्या तारखेत बदल;आता शिबिर ६ ऐवजी ५ ऑगस्ट रोजी

नागरिकांनी सुधारित तारखेची नोंद करून सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत लाभ घ्यावा; आयोजन आमदार सुरेश (आण्णा) धस यांच्या पुढाकाराने

0

click2ashti-आष्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराच्या तारखेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. यापूर्वी हे शिबिर दि.६ ऑगस्ट २०२६ रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली होती.मात्र,आता हे शिबिर एक दिवस अगोदर म्हणजेच दि.५ ऑगस्ट २०२६ (बुधवार) रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
हे मोफत महाआरोग्य शिबिर अनिशा ग्लोबल स्कूल ग्राऊंड, जामगाव रोड,आष्टी (जि. बीड) येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत पार पडणार आहे. विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, निदान व आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन या शिबिरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.आयोजकांनी सर्व नागरिकांना सुधारित तारखेची नोंद करून मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.हे शिबिर मराठवाडा भूषण लोकनेते आ.सुरेश धस यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले असून,नागरिकांनी गैरसमज टाळण्यासाठी नवीन तारखेची माहिती इतरांपर्यंतही पोहोचवावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.