पीडित मुलीला न्याय मिळावा,आरोपीला तत्काळ अटक करावी;कडा पोलीस चौकीसमोर उद्या आंदोलन
click2ashti-पीडित मुलीला न्याय मिळावा आणि संबंधित आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी,या मागणीसाठी कडा पोलीस चौकीसमोर उद्या सकाळी साडेदहा वाजता आंदोलन करण्यात येणार असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आंदोलनाच्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल होऊन वीस दिवसांचा कालावधी उलटला असतानाही आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.तसेच आरोपीला वैद्यकीय कारणास्तव अटकेपासून वाचविण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर पीडित मुलीला न्याय मिळावा आणि संबंधित आरोपीला अटक करण्यात यावी,या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.“न्याय व्यवस्थेत पैसा आणि गरीब असा भेदभाव होता कामा नये,”अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे.दरम्यान,आंदोलन शांततेत व शिस्तीत करण्यात यावे,असे आवाहन करण्यात आले असून,मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभागी व्हावे,असेही आवाहन करण्यात आले आहे.