आष्टी-येथील बाजार समिती मध्ये बुधवारी कांद्याचा लिलाव असल्याने खिळद येथील शेतकरी दुचाकीवर येत असताना पैठण बारामती रोडने भरधाव वेगात येत असलेल्या मालवाहु ट्रकने जोराची धडक दिली.यात दुचाकीवरील दोघाचा जागीच मुत्यु झाल्याची घटना घडली आहे. बाबासाहेब गर्जे वय(४५),नारायण गोल्हार वय (४३) असे मयतांची नावे आहेत.
आष्टी तालुक्यातील कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी कांद्याचा लिलाव असल्याने या लिलावासाठी खिळद येथील शेतकरी बाबासाहेब गर्जे व नारायण गोल्हार हे दुचाकी क्रमांक एम एच 16,बीएफ 9573 येत असताना पैठण बरामती रोडने लोंखडाने भरलेला ट्रक क्रमांक एमएच 12,ईएफ 3646 याने पाठीमागून जोरांची धडक दिल्याने दोघांचा जागीच मुत्यु झाला. ही घटना बुधवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर घडली.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post