व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आ.सुरेश धस यांच्या वतीने शरद रेडेकर यांची‘वैद्यकीय सहाय्यता सेवक’म्हणून नियुक्ती

0

click2ashti-पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते शरद रेडेकर यांची आमदार सुरेश धस यांच्या वतीने‘वैद्यकीय सहाय्यता सेवक’म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वसामान्य तसेच आर्थिक अडचणींमुळे उपचारापासून वंचित राहणाऱ्या गरजू रुग्णांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने जनहिताचे प्रश्न मांडणारे शरद रेडेकर यांनी सामाजिक कार्यातही आपला ठसा उमटविला आहे. आता वैद्यकीय सहाय्यता सेवक म्हणून त्यांच्यावर मतदारसंघातील गरजू रुग्णांना शासकीय वैद्यकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्ण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्ण तसेच महागड्या उपचारांचा खर्च पेलणे शक्य नसलेल्या गरजू नागरिकांना शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होणारी वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी रेडेकर कार्यरत राहणार आहेत.

आमदार सुरेश धस समावेत शरद रेडेकर

त्यामुळे योग्य उपचारासाठी धावपळ करणाऱ्या अनेक रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या नियुक्तीबद्दल शरद रेडेकर यांचे विविध स्तरांतून तसेच पत्रकार बांधवांकडून अभिनंदन होत आहे.पत्रकारितेतील जनहिताची भूमिका आणि सामाजिक बांधिलकी यांना वैद्यकीय सेवाकार्याची जोड मिळाल्याने त्यांच्या माध्यमातून‘रुग्णसेवा हीच समाजसेवा’या भावनेतून अधिक जोमाने काम होईल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.