व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आ.धस पिता-पुञांचा सकाळी सात,आ.आजबेंचा सकाळी नऊ तर माजी आ.धोंडे यांचा दुपारी बारा ला अतिवृष्टी पाहणी दौरा

दोन आमदार एक माजी आमदारांनी केली पाहणी

0

आष्टी-शनिवारी सायंकाळी गारपीट झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी रविवारी ताबडं फुटायच्या आत म्हणजे सकाळी ७ वा.आमदार सुरेश धस व त्यांचे पुञ जयदत्त धस यांनी तर सकाळी ९ वा.आमदार बाळासाहेब आजबे यांनी अधिका-यांसमावेत आणि दुपारी १२ वा.माजी आ.भीमराव धोंडे यांनी आष्टी तालुक्यातील अरण विहिरा, देऊळगाव घाट,केळ, पिंपळगाव, हरेवाडी, मराठवाडी, देवळाली, शेडाळा, उंदरखेल,गौखेल इत्यादी भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकरी हवाल दिल झाला आहे.शेतक-यांच्या बांधावर जाऊन व्यथा जाणून घेतल्या.
आष्टी तालुक्यात शनिवार दि.१५ रोजी सांयकाळी ५ च्या दरम्यान वादळ वा-यासह गारपीठ पावसाने अरण विहिरा, देऊळगाव घाट,केळ,पिंपळगाव,हरेवाडी,मराठवाडी,देवळाली,शेडाळा, उंदरखेल,गौखेल या भागात थैमान घातले जणू काय हिमालय,जम्मू काश्मीरमध्ये असल्यासारखे बर्फवृष्टी झाली.त्यामुळे शेतक-यांच्या जे काहि थोडंफार पीक हाती आलते ते ही नेस्तानाबुत झाले.या शेतक-यांना धीर देण्यासाठी व परिस्थिती जाणून घेण्यासाठी मतदार संघातील विधान परिषद,विधानसभेचे दोन आमदार व माजी आमदार यांनी भेटी देऊन पाहणी केली.पण हि पाहणी नुसती फोटोसेशन पुरती नसावी शेतक-यांना मदत मिळवून देण्यासाठी असावी अशी मागणी गारपीठ ग्रस्त शेतकराने केली आहे.या गारपिटीमुळे कांदा,गहू या पिकांसह डाळींब,संत्री आणि आंबा या फळझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या दोन्ही आमदारांच्या दौरात तहसीलदार विनोद गुंडामवार,तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे आणि इतर कर्मचारी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.