स्त्रियांचा सन्मान केला तर तो देश महासत्तेकडे वाटचाल करेल-प्राजक्ता धस
राजमाता जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळा
आष्टी-प्रत्येकाच्या आयुष्यात स्रीचे स्थान मोठे आहे प्रत्येक पुरुषांनी स्त्रियांचा सन्मान केला तर तो देश महासत्तेकडे वाटचाल करेल असे प्रतिपादन प्राजक्ताताई सुरेश धस यांनी केले जिजाऊ ब्रिगेडच्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
आष्टी येथील जिजाऊ मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या सहकार्याने जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने राजमाता जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळा राजमाता जिजाऊ कार्यालय व वस्तीगृह आष्टी येथे पार पडला. तालूक्यातील कर्तुत्वान महिलांचा प्राजक्ताताई सुरेश धस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष सेवा संघाचे शिवश्री अर्जुनराव तनपुरे,जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्षा शिवमती वर्षाताई माने,जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ शिवश्री आशोक ठाकरे,प्रा.कावेरीताई खुरने यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थित होते
यावेळी पुढे बोलताना सौ.धस म्हणाल्या की, सुवर्णाताई गिर्हे यांनी जो आष्टी तालुक्यातील विविध क्षेत्रातील कर्तुत्वान महिलांचा सन्मान केला आहे हे कार्य फार कौतुस्कास्पद आहे.यापुढे महिलांनी एक सक्षम समाज घडविला पाहिजे ही काळाची गरज आहे.महिलांनी आपल्या दैनंदिन कार्याबरोबरच आपल्या आरोग्याची पण काळजी घेणे गरजेचे आहे. सुवर्णाताईने लवकरच महिलांसाठी एक आरोग्य शिबीर आयोजित करून महिलांचे आरोग्य तपासणी करावी प्रत्येकाने आपल्यापासून बदलायला हवे ज्यावेळी हा बदल स्वतःपासून केला जाईल त्यावेळी संपूर्ण राष्ट्र बदलेल असे यावेळी सौ. धस शेवटी म्हणाल्या.यावेळी सुवर्णाताई म्हणाल्या क,आम्ही जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून दरवर्षी तालुक्यातील कर्तुत्वान महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल प्राजक्ताताईंनी सांगितल्याप्रमाणे लवकरच महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येईल.या पुरस्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.