आष्टी तालुक्यात अवकाळीने घेतले दोन बळी;केरूळ व हिंगणी शिवारात वीज पडून दोन महिलांचे दुर्दैवी मृत्यू
शेतक-यांनी पुढील दोन दिवस काळजी घ्यावी-आ.सुरेश धस
आष्टी-तालुक्यात सर्वदूर विजांच्या कडकटासह वादळीवारे सुरू होऊन अनेक ठिकाणी पाऊस पडला असून यामध्ये काजल विकास माळी (वय २३) रा.केरुळ व राणी संदीपान सावंत रा.सांगवी आष्टी (वय ३५)ही माहेरी हिंगणी येथे वडिलांकडे गेल्या असताना अंगावर वीज पडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत.पारगाव जो.येथील युवराज नवनाथ भोराडे यांची बैलजोडी,तसेच शिरुर का.तालुक्यातील भडखेल येथील शेतकरी मधुकर आहेर यांचा एक बैल वीज पडुन मृत्यू झाल्याची माहिती आहे.
आष्टी तालुक्यात दि.१९ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सर्वदूर जोरदार वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी पाऊस झाला असता या दुर्दैवी घटनेत काजल विकास माळी (वय -२३) रा.केरुळ व राणी संदीपान सावंत रा.सांगवी आष्टी (वय ३५) ही माहेरी हिंगणी येथे वडिलांकडे गेल्या असताना अंगावर वीज पडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत.पारगाव जो.येथील युवराज नवनाथ भोराडे यांची बैलजोडी,तसेच शिरुर का.तालुक्यातील भडखेल येथील शेतकरी मधुकर आहेर यांचा एक बैल वीज पडुन मृत्यू झाल्याची माहिती आहे.
पुढचे दोन दिवस शेतकऱ्यांनो काळजी घ्या-आ.धस
आष्टी,पाटोदा,शिरूर कासार मतदार संघातील नागरिकांना विनंती आहे, की पुढील दोन दिवस पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता हवामान खाते व पंजाबराव डख यांनी सांगितली आहे, सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की सध्याची परिस्थिती पाहता वातावरण खूप खराब असून वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस येण्याची,वीज कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी सर्व बांधवांनी आपली स्वतःची व आपल्या जनावरांची काळजी घ्यावी.तरी या कालावधीत आपली जनावरे झाडाखाली बांधू नयेत,तसेच शेतामध्ये काम करताना पावसाचे चिन्ह दिसताच सुरक्षित ठिकाणी जावे अशी विनंती आहे.मयतांना नैसर्गिक आपत्ती मदतनिधी मिळावी अशी मागणी आ.सुरेश धस यांनी केली आहे.
तलाठी मंडळअधिकारी यांना पंचनामा करण्याचे आदेश
पुढील तीन चार दिवस पावसाचे वातारण असून,शेतातील पिकांचे झालेले नुकसान व ज्या काहि दुर्देवी घटना घडल्या आहेत.त्या सर्व ठिकाणी संबंधित मंडळअधिकारी व तलाठी यांना पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी सांगीतले.