पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर नेतृत्व सिध्द करत भारत देशाची मान जगामध्ये उंचावली-सुरेश धस
क्लिक2आष्टी अपडेट-भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रखर राष्ट्रभक्तीतून जनतेप्रती असलेल्या सततच्या चिंतनातून आणि अखंड परिश्रमातून जागतिक पातळीवरील आपले नेतृत्व सिद्ध केले असून,संपूर्ण जगामध्ये भारत देशाची मान उंचावण्याचे काम केले आहे.देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडी अडचणी सोडवण्याचे महान कार्य पंतप्रधान मोदी यांनी केले असल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकी मध्येही भारतीय जनता पार्टीचेच सरकार येणार असल्याचे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.

आष्टी मतदार संघात भारतीय जनता पार्टीच्या वतीने ३० मे ते ३० जून या कालावधीमध्ये अनेक उपक्रम आयोजित केले असून या कालावधीमध्ये सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळातील योजनांबाबत माहिती पोहोचण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत.त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख,बुथ समिती,शक्ती केंद्रप्रमुख,विस्तारक,गणप्रमुख,गटप्रमुख,यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये ते प्रमुख मार्गदर्शन करताना आ.धस बोलत होते.यावेळी तात्यासाहेब हुले,रामराव खेडकर,सुरेश उगलमुगले, ज्ञानेश्वर माऊली जरांगे,महेंद्र गर्जे, डॉ.पांडुरंग चौधरी,रमेश ढगे यांची समायोजित भाषणे झाली.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय आजबे,तालुकाध्यक्ष भागवत येवले,नगराध्यक्ष रोहिदास गाडेकर,नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,सभापती रमजान तांबोळी, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,आदिनाथ सानप, प्रकाश खेडकर, किरण शिंदे,कल्याण तांबे, आदम सय्यद,पांडुरंग चौधरी,कल्याण पोकळे,किरण बांगर,जिया बेग,गणेश शिंदे,राजू शिंदे,अनिल ढोबळे,अनिल काथवटे, अशोक सुपेकर,किशोर झरेकर, शरीफ शेख,सुरेश वारंगुळे आदीसह आष्टी,पाटोदा शिरूर कासार मतदारसंघातील बूथ प्रमुख,विस्तारक,शक्तिकेंद्र प्रमुख,पन्ना प्रमुख,बूथ समिती सदस्य सह भाजपा पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

पुढे म्हणाले, सेवा सुरक्षा आणि गरीब कल्याण हेच भारतीय जनता पार्टीचे यशस्वीतेचे सूत्र असून,सन २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदा संपूर्ण बहुमत घेऊन भारतीय जनता पार्टीची केंद्र शासनामध्ये सत्ता प्रस्थापित झाली.त्या काळातील उत्तम कामगिरीमुळे सन २०१९ मध्ये भारतातील जनतेने ३०३ लोकसभा खासदार निवडून देऊन.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची पावती दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ ते २०२३ या नऊ वर्षाच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसांच्या गरजांची पूर्तता होत असताना दैनंदिन जीवनातील व्यवहार सोपे व्हावेत.सरकारी योजनांचे अर्थसहाय्य लाभार्थ्यांपर्यंत कोणत्याही मध्यस्था शिवाय लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी थेट बँक खात्यावर अर्थसाह्य पोहोचवण्याचे काम केले.त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती,वेगवेगळ्या योजनांचे अनुदान, पंतप्रधान आवास योजने अनुदान,शौचालय यांचे अनुदान,यांचा समावेश आहे.यापूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या योजनांचे अनुदान मिळवण्यासाठी गोरगरीब गरजू लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे घालावे लागत असत ते आता बंद झाले आहे.भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा यासाठी किसान सन्मान निधी योजना राबवून त्यामध्ये केंद्र शासनाकडून ६००० रू. प्रतिवर्षी मंजूर करण्यात येत असून त्यामध्ये आता महाराष्ट्र शासनाच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या सरकारने आणखी ६००० रू. रुपयांची वाढ केल्याने आता शेतकऱ्यांना १२ हजार रुपये प्रति वर्षी मिळणार आहेत.सन २०१४ पर्यंत केवळ ४० % लोकांमध्ये स्वच्छतागृह होती.आता जवळपास ७५ % लोकांकडे स्वच्छतागृह बांधकाम करण्यात आलेले आहे.त्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत झालेली आहे.

गोरगरीब जनतेसाठी आयुष्यमान भारत या योजने अंतर्गत ५ लाख रुपये पर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत करण्यात येत असून या योजनेखाली २२ कोटी लोकांची नाव नोंदणी करण्यात आलेली असून ४ कोटी रुग्णालयांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे..
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ३ कोटी लोकांचे घराचे बांधकाम करण्यात आलेले आहे.१२ कोटी लोकांना..” हर घर जल ” योजनेअंतर्गत नळ योजनेचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.तसेच पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेद्वारे ३० कोटी लोकांना विमा संरक्षण देण्यात आले असून.. सौभाग्य योजनेद्वारे ३ कोटी लोकांपर्यंत वीज जोडणी करण्यात आलेली आहे २५ लाख दिव्यांग लोकांना व्हीलचेअर्स देऊन त्यांना मदत करण्यात आली असून..”उज्वला” या योजनेअंतर्गत २० कोटी महिलांना घरगुती गॅसचे वाटप करण्यात आलेले आहे.या शिवाय
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळामध्ये जगामध्ये लस उपलब्ध नसताना भारतातील वैद्यकीय उद्योजकांकडून लस निर्माण करण्यात आली आणि जगातील पाच प्रगत राष्ट्रांमध्ये भारताने उच्च प्रतीचे काम या लसीकरणामुळे झाले आहे.भारत देशाच्या संरक्षणासाठी सर्वात महत्त्वाचे पंतप्रधान मोदींनी केलेले काम म्हणजे शेजारच्या राष्ट्राकडून सतत होणारा दहशतवादाचा कायमस्वरूपी बिमोड करण्यात आला असून,शेजारी राष्ट्रांना तुमच्या घरात घुसून मारू असा संदेश देत सन २०१६ आणि २०१९ मध्ये सर्जिकल स्ट्राइक करून भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रदर्शन घडवले आहे.