तुम्हीच सांगा कमाई कोणाची जास्त;गौतीमी पाटील की,इंदूरीकर महाराजांची?
क्लिक2आष्टी अपडेट-समाज प्रबोधन करतांना पांढ-या काॅलरपासून ते सर्वसामान्यांना पैसा हा माणसाच्या जिवनात काहिच नाही.माणूस मेल्यावर काहिच बरोबर येत नाही असे समाजाला डोस देण्या-या ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर यांची एका दिड तास किर्तनाची पन्नास ते साठ हजार रूपये सुपारी? असून,आता तुम्हीच सांगा गौतमी पाटील तीन गाण्यांचे तीन लाख घेते तर तीन किर्तन करून दिड लाख रूपये रोज कमिवणारे इंदूरीकर महाराज यांची कमाई जास्त की गौतमी पाटील यांची जास्त आहे.असा सवाल नागरिकातून व्यक्त केला जात आहे.

गेल्या तीन महिन्यापूर्वी ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर (देशमुख) हे आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे किर्तनासाठी आले असता,गौतमी पाटील यांचे नाव न घेता सध्या नविन क्रेज आली असून,ती तीनच गाणे नाचती अन् तीन लाख घेते अशी बोचरी टिका केली होती.यावर गौतमी पाटील यांनी प्रतिक्रीया देत,
ह.भ.प.इंदूरीकर महाराजांविषयी मी काय बोलणार ते खुप मोठे महाराज असून,त्यांची अन् माझी बरोबरी नसल्याचे तीने सांगीतले.परंतु सा-या समाजाला समाज प्रबोधनाच्या माध्यमातून सध्याच्या युगात लोकं पैशाच्या मागे लागले असून,पैसा हा सर्वस्व मानत असून,पैसा आयुष्यभर जन्माला येणार नाही.शेवटी सर्व काहि येथेच ठेऊन जायचे आहे.असे ज्ञान लोकांना देण्याची महाराजांची एका दिड तासाच्या किर्तनाची सुपारी ५० ते ६० हजार? असून दिवसातून ते दोन ते तीन किर्तन करतात म्हणजे ह.भ.प.इंदूरीकर महाराज यांची दिवसाची कमाई दिड ते पावणे दोन लाख रूपये आहे.आता तीन लाख घेऊन तीन गाणे नाचणा-या गौतमी पाटील यांची कमाई की,दिड तास किर्तनाचे पन्नास ते साठ हजार रूपये घेणा-या ह.भ.प.इंदूरीकर महाराजांची कमाई जास्त आहे.हे आता जनतेनेच ठरवावे.हा माञ,सध्या कमालीचा अन् चर्चेचा विषय ठरत आहे.
अचानक आलेल्या सुपारीचा दर वेगळाच
ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदूरीकर यांच्या किर्तनाची क्रेज भलतीच फर्मात आली आहे.म्हणे ते एका किर्तनाला ३०-३५ हजार घेत असल्याचे संयोजक सांगतात.त्यातच अचानक एखाद्या मोठ्या लोकनेताचा वाढदिवस असला अन् गर्दी जमावायची म्हणलं तर ह.भ.प.इंदूरीकर महाराजांच्या किर्तना शिवाय पर्याय नसतो.त्यामुळे नेता म्हणतो काहि पण करा अन् इंदूरीकर महाराजांना आणा त्यामुळे महाराजही आपला प्रबोधनाचा रेट डबल सांगतात.अशी त्यांच्या कमाईची चर्चा होते.त्यामुळे गौतमी पाटील यांची की,ह.भ.प.इंदूरीकर महाराजांची कमाई जास्त आहे.याची चर्चा सध्या चवीने सुरू आहे.
नेमकं इंदूरीकर माध्यमांना का? अडवतात
ज्या ज्या ठिकाणी इंदूरीकर महाराजांचे किर्तन आयोजित केले जाते.तिथे तुफान गर्दी असते,आयोजक माध्यमांच्या प्रतिनिधीला आवर्जुन बोलवितात.शिवाय आयोजकांच्याही एक कॅमेरा किर्तनस्थळी लावलेला असतो परंतु इंदूरीकर महाराज जे बोलतात ते कोणी तरी व्हिडीओ शूटींग मोबाईल द्वारे केले जाते.त्यांचे वक्तव्य सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हायरल होते.त्यामुळे अनेक वेळा इंदूरीकर महाराज अडचणीत आले आहे.परंतु इंदूरीकर महाराज किर्तनातून समाजाला उपदेशाचे डोस पाजतात हि चांगली बाब आहे.तर मग,इंदूरीकर महाराज आपल्या किर्तनात माध्यमांना शुटींग करतांना का?अडवतात.म्हणजे त्यांचे किर्तन ते नियम बाह्य करतात का?असा सवाल नागरिकांतून होत आहे.