पुर्णवादी बॅक ग्राहकांचा विश्वासास पाञ ठरली-डाॅ.सुभाष जोशी
आष्टी शाखेत ग्राहक मेळावा संपन्न
क्लिक2आष्टी अपडेट-आज ही पतसंस्था बुडाली,या ठेवीदारांना धोका झाला,कोट्यवधी रुपये बुडवून संचालक फरार या अन अशा बातम्यांनी एकीकडे गोंधळ उडालेला असताना तब्बल ३७ वर्षांपासून ठेवीदार अन् ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देत पुर्णवादी नागरी सहकारी बॅक मात्र लोकांच्या विश्वासाला पात्र ठरली असून,या यशात बॅकेचे अध्यक्ष डाॅ.अरूण निरतंर यांच्यासह संचालक,बॅक कर्मचारी,ठेवीदार,कर्जदार या सर्व असल्याचे प्रतिपादन,पुर्णवादी बॅकेचे बोर्ड आॅफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष तथा पुर्णवादी बॅक संचालक, डाॅ.सुभाष जोशी यांनी केले.
आष्टी येथील पुर्णवादी बॅक शाखेचा ग्राहक मेळावा दि.९ आॅगस्ट बुधवारी सांयकाळी ६ वा.शाखेत आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या सुरूवातीला भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी जोशी बोलत होते.यावेळी संचालिका डाॅ.सुरेखा देशमुख आष्टी शाखेचे स्थानिक सल्लागार डाॅ.नाना कुलकर्णी,नगराध्यक्ष जिया बेग,व्यापारी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष संजय मेहेर,बॅकेचे इॅजि.दत्ताञय देशमुख,पंडित दिनदयाळ पतसंस्थचे अध्यक्ष बाबुराव अनारसे,आष्टी शाखेचे विधीतज्ञ अॅड.बाळकृष्ण देशपांडे,महेश सांवत,यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलतांना जोशी म्हणाले,गेल्या तीस वर्षात तब्बल १३०० कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असून ५०० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.ज्या माध्यमातून हजारो तरुण व्यावसायिकांनी आपले उद्योग सुरू केले आहेत.तसेच सध्या आरबीआयच्या नियमाप्रमाणे बॅक चालविणे झिक्रिचे बनले असल्याचेही त्यांनी सांगीतले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक आष्टी शाखेचे शाखाधिकारी आत्माराम जगताप म्हणाले,आपल्या शाखेच्या ६४ कोटी ठेवी असून,१६ कोटी कर्ज वाटप करण्यात आले आहे.तसेच तालुक्यातील ब-यापैकी गावात पुर्णवादी शाखेचा खातेदार असल्याचेही जगताप यांनी सांगीतले.यावेळी संजय मेहेर,सुखलाल मुथ्था,डाॅ.मधूकर हंबर्डे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.