व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

कुणबी समाज कोण आहे,ते कुण्या येड्या गबाळ्यांना सांगायची गरज नाही-ह.भ.प.अशोक भोसले

आष्टीयेथील साखळी उपोषणात किर्तन सेवा

0

click2ashti update-संत तुकारामाच्या गाथेत १६०० वर्षापुर्वी संत तुकारामाने लिहून ठेवले आहे की,कुणबी समाज कोण आहे.त्यावेळेस लिहून ठेवल्याने आता कुणबी कोण आहे ते कुण्या येड्या गबाळ्यांना सांगायची गरज नसल्याचे प्रतिपादन ह.भ.प.अशोक महाराज भोसले यांनी केले आहे.
मराठा सामाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपषोणास पाठिंबा देण्यासाठी आष्टी शहरातील छञपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाजाच्यावतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले.यानिमित्त उपोषणाच्या दुस-या दिवशी राञी ८ वा.देण्यात येणा-या किर्तन सेवेत ह.भ.प.भोसले महाराज बोलत होते.यावेळी सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.पुढे बोलतांना ह.भ.प.भोसले म्हणाले,पहिल्यांदाच मराठा समाज हक्कासाठी एकञ आला आहे.पण ज्यासाठी आता एकञ आला आहे त्यात यश मिळालेच पाहिजे,नवराञात सर्वांनीच आपले घर स्वच्छ केले आणि एका घरातील डब्याला मुंग्या लागल्या म्हणून मुंग्या मारायची पावडर आणायला मुलाला दुकानात लावले ती पावडर आणल्यानंतर घरातील मुलाच्या वडीलांनी ती दुकानदाराकडे परत घेऊन जाऊन हि मुंग्या मारायची पावडर मला नको असे सांगताच दुकानदार म्हणाला का देता परत हि पावडर तर त्या मुलाच्या वडिलांनी सांगितले की ह्या पावडरलाच मुंग्या झाल्या आहेत.अन् अशीच परिस्थिती आत्ताच्या राजकारण्यांची झाली असून,सध्याचे राजकाराणावर न बोललेल तरच बरं आहे.भ्रष्ट राजकारण्यांनी आपली सिमा ओलाडंली असल्याचे त्यांनी सांगत आपण आपल्याला आरक्षण मिळेपर्यंत एकञ राहून हा लढा जिंकायचा आहे.यासाठी सर्वांनी मी पणा सोडून एक राहून समाजासाठी सोबत राहण्याची वेळ आपल्यावर आली असल्याचे प्रतिपादन ह.भ.प.अशोक महाराज भोसले यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.