विहीर व शेत तलाव मंजुरीसाठी पैसे खाणा-यांनी आपल्या लायकीनुसार बोलावे-हारिभाऊ दहातोंडे
आष्टी-पंचायत समितीचे स्वतः सभापती नसतानाही सभापती म्हणुन मिरवणा-या गोरगरीब शेतक-यांच्या विहीरी व शेततलाव मंजुरीसाठी पैसे घेवून लाखो रूपयाची माया जमवणा-या बद्रीनाथ जगताप यांनी स्वतःची लायकी ओळखुन आमदार बाळासाहेब आजबे यांच्यावर बोलावे आपली लायकी काय आपण बोलतो काय याचे भान राखावे,नसता तालुक्यात फिरणे कठिण होईल असा इशारा राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी दौलावडगाव गटाचे नेते हारिभाऊ दहातोंडे यांनी दिला आहे.
आष्टी तालुक्यातील वाळूंज येथील रस्ताकामाच्या उदघाटनाप्रसंगी आपल्या नेत्याला खुष करण्यासाठी स्वयंम घोषीत सभापती बद्रीनाथ जगताप यांनी लायकी सोडून टिका करत सुटले.वास्तविक पाहता जगताप हे कुठल्याही पदावर नसताना स्वतःला सभापती म्हणुन मिरवत आहेत.पंचायत समिती अंतर्गत नरेगा योजनेतुन गोरगरीब शेतक-यांकडुन विहीरी व शेततलाव मंजुरीसाठी पैसे घेणा-या जगताप यांची कर्तव्यदक्ष आमदार बाळासाहेब आजबे यांच्यावर बोलण्याची लायकी नाही.पंचायत समितीमध्ये आपण काय घोटाळे केले आहेत व या व्यतिरिक्तही आपण काय उद्योग करता याविषयी आम्हाला बोलण्यास भाग पाडु नये,आम्ही जर तोंड उघडले तर आपल्याला आष्टी तालुक्यात नाही तर गावातही हिंडता येणार नाही,काचेच्या घरात राहणा-यांनी दुस-यांच्या घरावर दगड फेकण्याचे काम करू नये आपण गेल्या दोन वर्षात आष्टी तालुक्यातील शेतक-यांकडुन लाखो रूपयाची माया गोळा केली आहे.हे सर्वश्रुत असुन याचे परिणाम येणा-या निवडणुकीत आपल्याला दिसुन येतील आमदार बाळासाहेब आजबे यांनी केलेल्या विकास कामामुळेच विरोधकांना पोटशुळ उठला आहे.त्यांनी केलेली विकास कामे विरोधकांना देखवत नाहीत,त्यांनी कागदोपञी केलेली कामे लोकांना दिसत नाहीत.आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी केलेल्या विकास कामामुळेच आज ते घराघरात पोहचले आहेत.त्यामुळे विरोधकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. विरोधकांकडे आमदार आजबे काका यांच्यावर टीका करण्यासाठी कसलाही मुद्दा नसल्यामुळे आता आमदार आजबे यांच्यावर तोंडसुख घेत असुन यापुढे विरोधकांनी जबाबदारीने व आपल्या लायकीने बोलावे नसता जशास तसे उत्तर दिले जाईल.असा इशाराही हारिभाऊ दहातोंडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पञकाद्वारे दिला आहे.