बीडची जनता सुज्ञ,विचार करणार-पंकजा मुंडे; जनता बरोबर असल्याने माझा विजय निश्चीत-बजरंग सोनवणे
बीड लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू
click2ashti update-बीडची जनता फार सुज्ञ आहे ती विचार करून निर्णय घेणार अशी प्रतिक्रिया बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी दिली आहे. बीडमध्ये महाविकास आघाडीने शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना बीडमध्ये उमेदवारी जाहीर केली आहे.यावर पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे.तर मागील निवडणुकीत सर्व नेते माझ्याबरोबर होते म्हणून माझा पराभव झाला,आता जनता बरोबर असल्याने माझा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन बीड लोकसभेचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केले.

बीड लोकसभा निवडणूकीचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे उमेदवार जाहीर झाल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात दाखल झाले.आष्टी तालुक्यातील कडा येथे संवाद साधताना बोलत होते.जिल्ह्यातील जनतेचा सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठी मी निवडून लढत आहे.जनता निवडून हाती घेऊन मला निवडून देणार आहे.यात कसलीही शंका नसल्याचे देखील त्यानी बोलून दाखवले.सर्व सामान्य जनता माझ्याबरोबर असल्याने विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास त्यानी बोलून दाखवला.यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर, महेबूब शेख,राम खाडे,किशोर हंबर्डे, सुनिल नाथ,दिपक खिळे,यांच्यासह शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.तर सोनवणे यांची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी यावेळी बजरंग सोनवणे यांना शुभेच्छा देत. “सोनवणे यांना तिकीट जाहीर झाले असेल,तर त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा आहे.माझी निवडणुकीची तयारी ही नुसती निवडणूक जाहीर झाल्यावर सुरू होत नाही.तर पाचही वर्ष चालू असते.संपर्क,कामे,समाजाची कामे हे सर्व पाच वर्षे चालू असते.त्यामुळे निवडणुकीमुळे माझ्या रुटीनमध्ये फरक पडणार नाही”, असे त्या म्हणाल्या.बीडची जनता फार सुज्ञ तसेच “प्रीतम ताई सुद्धा मतदारसंघात दौरे करत होत्या.आता आमचे मित्र पक्ष देखील काम करत आहेत.उमेदवारी जाहीर झाल्याचे हे निमित्त आहे. कोणत्याही उमेदवाराला आपला विजय होणार असे वाटणं आवश्यक असते.मात्र तुम्ही पाच वर्षे लोकांसाठी काय करता, मतदारांशी भेटता की नाही या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असतात. बीडची जनता फार सुज्ञ आहे आणि ती नक्कीच विचार करेल”,असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.