व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीहुन नगरला जाणाऱ्या नागरिकांनी कडा मार्गे जाऊ नये तहसिलदार प्रमोद गायकवाड यांचे आवाहन

पावसाने कड्याचा पर्याय पुल गेला वाहून

0

click2ashti update-तालुक्यात सर्व झालेल्या पावसाने कडा येथील नगर बीड महामार्गावरील तात्पुरता बनवण्यात आलेला पूल नदीत पाणी आल्याने वाहून गेला आहे. नगरला जाणा-या नागरिकांनी आता पर्याय रस्त्याने जावे कारण हा रस्ता बंद आहे.असे आवाहन तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी केले आहे.

अष्टी शहरासह तालुक्यात सोमवार दि.८ रोजी दुपारपासूनच पावसाने सुरुवात करत हजेरी लावली आहे.तालुक्यातील धामणगांव,धानोरा,पिंपळा,टाकळसिंग, दौलवडगांव व कडा या महसुली मंडळात जोरदार पाऊस झालेला तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे.गेल्या वर्षभरापासून नगर बीड या राष्ट्रीय महामार्गाचे साबलखेड- आष्टी या रस्त्याचे काम सुरू आहे.कडा येथील नदीवरील जुना पुल पाडल्याने येथून पर्याय व्यवस्था म्हणून बाजूने तात्पुरत्या स्वरूपात बनवण्यात आलेला फुल कालच्या पावसाने कडीनदीत पाणी वाढल्याने पुल वाहून गेला तरी आष्टी वरून नगरला जाणाऱ्या नागरिकांनी कडा मार्गे न येता पर्याय मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन तहसिल प्रमोद गायकवाड यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.