आष्टीत होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा-माजी आ.भीमराव धोंडे
सलग दुसऱ्या वर्षी होणार स्वामीनाथन कृषी प्रदर्शन
click2ashti update-गेल्या वर्षी कृषी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने,या कृषी प्रदर्शनाने तालुक्यासह मतदार संघातील शेतक-यांना चांगला फायदा झाल्याने ह्याही,आष्टी शहरात दि.२९ ऑगस्ट १ सप्टेंबर चार दिवस राज्यस्तरीय डाॅ.स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन होत असून,या कृषी प्रदर्शनाचा आष्टी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतक-यांनी याचा लाभ व्हावा असे आवाहन कृषी प्रदर्शनाचे संयोजक तथा माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले आहे.

आष्टी येथील भगवान महाविद्यालय येथे दि.३ रोजी दुपारी १.३० वा.आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत माजी आ.भीमराव धोंडे बोलत होते.यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले,ज्यांनी शेतीसाठी संपूर्ण आयुष्य घातले व शेती पुरक आणि शेतीचे महत्व देशासह जगाला दाखवून दिले आहे.म्हणून आपण गेल्यावर्षी पासुन डाॅ.स्वामीनाथन कृषी प्रदर्शन घेत आहोत.या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे कृषीमंत्री ना.धनजंय मुंडे,माजी मंत्री आ.पंकजा मुंडे, पद्मभूषण पुरस्कार प्राप्त पोपटराव पवार ह्यांच्या हस्ते होणार आहे.तसेच या प्रदर्शनीमध्ये फळबाग भाजीपाला फुल शेती व वनौषधी कापूस ज्वारी गहू कडधान्य तेलबिया पाणलोट विकास ऊस पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय कृषी अभियांत्रिकी व अवजारे इत्यादी विभागां सोबतच छञपती शाहू,फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आले असून, संस्था व शासनाच्या इतर विभागांची दालने राहणार आहेत.शेतकरी बंधूचे ग्रामीण विकासा संबंधी कृषी संलग्नित व्यवसाय व शेतीपूरक जोडधंदे तसेच कृषीमालाच्या प्रक्रिया उद्योगा विषयीची दालने कृषी प्रदर्शनीचे मुख्य आकर्षण ठरणार असुन कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांकरिता प्रेरणादायी ठरणार आहे.याशिवाय गट शेती,स्वयंसहायता बचत गटांच्या यशोगाथा,महिला बचत गटांनी उत्पादित केलेले कृषी उत्पादने, शेतकऱ्यांनी तयार केलेले नाविन्यपूर्ण शेती अवजारे इत्यादींची अभिनव दालने प्रदर्शनीचे आकर्षण केंद्र ठरणार आहे.या प्रदर्शनीमध्ये १००-१५० हून अधिक दालने राहणार असून ही कृषी प्रदर्शनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदपर्वणी ठरणार आहे.केवळ बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील शेतकरी बंधू -भगिनींना, युवक- युवतींना या प्रदर्शनीची सहभागी होणार आहेत.यंदा सुद्धा अतिशय भव्यदिव्य प्रमाणामध्ये या राज्यस्तरीय प्रदर्शनी,कृषी महोत्सव व चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी आधुनिक शेती व्यवसायातील विविध नावीन्यपूर्ण संधींचे प्रदर्शन या निमित्ताने शेतकरी बंधू-भगिनींना बघावयास मिळणार असून ड्रोन तंत्रज्ञानासह स्वयंचलित यंत्रे-अवजारे,पीक संरक्षणाच्या विविध पद्धती,औषधी व सुगंधी जाती, फळे- फुले, रानभाज्या आ Open in New Tab कानेक श्चतच लक्षवेधी ठरणार आहे.प्रदर्शनी ची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ०७ वाजेपर्यंत असून ही प्रदर्शनी जिल्ह्यासह राज्यात बंधू-भगिनी,युवक-युवतीना रोजगार स्वयंरोजगार व कौशल्याच्या नानाविध संधी प्रत्यक्ष अनुभवत आत्मसात करण्याची एक पर्वणीच ठरणार असल्याचे माजी आ.धोंडे यांनी सांगीतले.
या वर्षी लवकरच प्रदर्शन
गेल्यावर्षी डिसेंबर मध्ये कृषी प्रदर्शन घेतले होते.पण हे प्रदर्शन उशीरा झाल्याने शेतक-यांचे पिकांची पेरणी झालेली असते म्हणून या वर्षी लवकर कृषी घेण्यात येणार तसेच मागील वर्षी झालेल्या कृषी प्रदर्शनात जवळपास सव्वा लाख शेतक-यांनी भेट देत सात ते आठ कोटींची उलाढाल झाली असल्याचे माजी आ.धोंडे यांनी सांगितले.
हेलीकॅप्टरची होणार राईड
या कृषी प्रदर्शनात करांना हेलिकॉप्टरमध्ये बसायची हौस पूर्ण होणार आहे.या प्रदर्शनाच्या कालावधीत आष्टी शहरात चार दिवस हेलिकॉप्टर राईड(चक्कर)शेतकऱ्यांना तीस किलोमीटर सहा हजार रुपयात मिळणार आहे.यासाठी नागरिकांनी छत्रपती,शाहू,फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालयात नाव नोंदणी करावी.