व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

ग्रामीणभागाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यां सोबत सरपंच परिषदेची बैठक घेऊ-शरद पवार

गावगाड्यांच्या मागण्या रास्त;मुख्यमंत्र्यांसमवेत सरपंच परिषदेच्या पदाधिका-यांची बैठक घेऊ

0

click2ashti update-ग्रामीण भागातील विविध प्रकारच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संयुक्त बैठक घेऊत.असे आश्वासन माजी केंद्रीयमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे. सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे व पदाधिकाऱ्यांनी पुणे येथील मोदी बाग येथे शरद पवार यांची भेट घेवून ग्रामीण भागातील विविध मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या.
ग्रामीण भागाकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे.आंदोलने केली,मोर्चे काढले,निवेदने दिली परंतु परिणाम होत नसल्याने आपण ग्रामीण भागाचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्याकडे केली.त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देवून त्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक घेवूत असेल सांगीतले.अशी माहिती प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करताना सरपंच परिषदेचे पदाधिकारी दिसत आहेत.

आष्टी येथील येथील सरपंच परिषदेच्या मुख्य कार्यालयात सोमवार (५ ऑगस्ट) रोजी दुपारी १.३० वाजता घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीस, राज्यविश्वस्त तथा कोषाध्यक्ष आनंद जाधव ,कोअर कमिटी प्रमुख आबासाहेब सोनवणे,राज्य प्रसिद्धी प्रमुख संजय बापू जगदाळे राज्य कोअर कमिटी सदस्य जे.डी.टेमगिरे,अरुण कापसे,संजय शेलार,शत्रुघन धनवडे,अंबादास गुजर,गोविंद गायकवाड,अॅड दयानंद पाटील,अभिजीत पाटील,युवराज पाटील,लखन पाटील, संदीप कांबळे,पंढरीनाथ भोपळे,जी.डी.गुरव,जोशना पाटील,शिवाजी कांबळे (करवीर),बी.एम.पाटील(भडगावकर),शिवाजी पाटील (कासारी),जयसिंग पाटील(सोनगे)हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.