परिक्षार्थी विद्यार्थ्यांचे हाॅलतिकीटच नाही आले,भगवान महिविद्यालयात गोंधळ
औरंगाबाद विद्यापीठाचा सावळा गोंधळ
आष्टी-दोन वाजता विद्यार्थ्यांचा पेपर अन् विद्यापीठाकडून परिक्षार्थी विद्यार्य्थांना हाॅल तिकीटच मिळाले नाही.परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातच गोंधळ घालण्यास सुरू केला.त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने विद्यापीठाशी चर्चा केल्यानंतर पीआरएन नंबर टाकून परिक्षार्थ्यींना परिक्षा देण्यासाठी बसविण्यात आले.हा सर्व प्रकार आष्टी येथील भगवान महाविद्यालयात घडला.
आष्टी शहरातील भगवान महाविद्यालयात बी.ए.एस्सी,बी.ए.,बी.काॅम द्वितीय वर्षाच्या परिक्षा सुरू झाल्या असून,आज पहिलाच इंग्रजी,हिंदी व मराठी चा पेपर होता.या परिक्षेसाठी एकूण 247 विद्यार्थी असून यातील 67 विद्यार्थ्यांचे विद्यापीठाकडून आॅनलाईन हाॅल तिकीटच प्राप्त झाले नाहीत.त्यामुळे हाॅल तिकीट न आलेल्या विद्यार्थ्यींनी एकच गोंधळ केला.दुपारी दोन वाजता पेपर असल्याने विद्यार्थी एक वाजताच आले होते.यानंतर महाविद्यालय प्रशासनाने विद्यापीठाशी संपर्क केल्यानंतर विद्यापीठाने पीआरएन नंबर टाकून विद्यार्थ्यांना परिक्षा देण्याच्या सुचना दिल्या आणि नंतर विद्यार्थ्यांनी पेपर दिला.
विद्यार्थ्यांचे नुकसान नाही
विद्यापीठाने तीन वाजेपर्यंत हाॅलतिकीट आपलोड केले आहेत.काहि तांञिक अडचणीमुळे 67 विद्यार्थ्यांचे हाॅल तिकीट आले नव्हते पण त्या परिक्षार्थ्यी विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान न करता त्यांनी आजचा पेपर दिला आहे.आणि त्यांचे हाॅलतिकीटही आॅनलाईन आले आहेत.
-एस.आर.कर्डूळे,परिक्षा केंद्र प्रमुख भगवान महिविद्यालय आष्टी