व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

अभूतपूर्व उत्साहात…अलोट चाहत्यांच्या शुभेच्छांचा अखंड क्रियाशील नेतृत्व आ.धसांनी केला विनम्रतेने स्वीकार

विविध उपक्रम कार्यकर्त्यांनी दिला असाह्य निराधारांना मदतीचा आधार...

0

आष्टी-बीड जिल्ह्यावरच नव्हे तर राज्याच्या राजकारणात तीन दशकाहून अधिक काळ सर्वसामान्य जनतेच्या मनावर गारुड निर्माण केलेले अखंड क्रियाशील नेतृत्व आमदार सुरेश धस यांचा ५२ वा जन्मदिन अभूतपूर्व उत्साहात आणि प्रचंड अलोट गर्दीत अलोटच्या चाहत्यांच्या उपस्थितीत पार पाडला.
विधानसभा अध्यक्ष आ.मिलिंद नार्वेकर,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे,रेल्वे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे,खा.प्रीतमताई मुंडे,आ.राम शिंदे,अक्षय मुंदडा,आ.राणा जगजित सिंह पाटील,आ.लक्ष्मण पवार,आ.संग्राम जगताप,आ.मोनिकाताई राजळे,आ.बाबाजानी दुर्रानी,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.रश्मीताई बागल,बजरंग सोनवणे, रमेश आडसकर,मोहन जगताप,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात,युवा नेते अजय धोंडे आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या तर पदाधिकारी,कार्यकर्ते,तसेच सर्वसामान्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी इन्फंट इंडिया बीड या संस्थेचे दत्ता बारगजे,सेवाश्रम संस्थेचे सुरेश राजहंस पसायदान,सेवा प्रकल्पाचे गोवर्धन दराडे या सेवाभावी आणि निराधारांसाठी काम करणाऱ्या संस्थांना कार्यकर्त्यांनी आधार देण्याचे काम केले. यावेळी शुभेच्छा देताना दत्ता बारगजे म्हणाले की,आमदार सुरेश धस हे असे दातृत्व आहे.की अडचणीतल्या निराधारांना धीर देऊन आपल्याजवळ असेल ते सर्वस्व देण्याचे दातृत्व आहे.अगदी निवडणुकीच्या धामधुमीच्या काळात देखील त्यांनी माझ्या तिच्याविग्रस्त बालकांच्या मुखात चार घास जावेत यासाठी मी झोळी भरून घेऊन गेलेलो आहे.स्वकर्तृत्वावर स्वतःचे नेतृत्व घडवताना आजही आमदार सुरेश धस सलग अठरा तास काम करत आहेत बाराही महिने ते जनतेच्या सुखात दुःखात सामील असतात संकट काळात जनतेच्या मदतीसाठी पोहोचलेला एकमेव नेता आहे त्यांनी जनतेच्या मदतीसाठी जाताना कधीही काळाची वेळेचे बंधन पाळले नाही असे प्रतिपादन केले. तर आमदार सुरेश धस म्हणाले की, सर्वसामान्य जनता तरुणाई पासून वयोवृद्धांपर्यंत या सर्वांनीच मला ज्या शुभेच्छा दिलेले आहेत तेच माझे भांडवल असून या सर्वांनी व्यक्त केलेल्या प्रेमाचा यापुढे केवळ उतराई होण्यासाठी प्रयत्न करणे एवढेच माझे उद्दिष्ट आहे असे सांगितले. आज दिवसभर सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत आणि सायंकाळी सहा वाजले पासून रात्री ११ वाजेपर्यंत विविध भागातील दुर्गम भागातून सर्वसामान्य,आदिवासी,राजकीय नेते,शासकीय कर्मचारी,विविध भागातून आलेले सर्वसामान्य नागरिक यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.