व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आत्महत्या न करता नव्या संधींचा लाभ घ्यावा,ना.गडकरींचे आवाहन

दिल्लीत माजी आ.भीमराव धोंडे यांना 'महाराष्ट्र गौरव पुरस्कार' केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सन्मान

0

click2ashti-शैक्षणिक,कृषी,सामाजिक,राजकीय व धार्मिक क्षेत्रातील ४५ वर्षांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत माजी आमदार भीमराव धोंडे यांना नवभारत मीडिया ग्रुपतर्फे दिल्ली येथे आयोजित भव्य समारंभात’महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
दिल्ली विधानसभा अध्यक्ष विजेंदर गुप्ता व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ.सुधांशू त्रिवेदी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता मका, बांबूपासून इथेनॉल निर्मितीसारख्या नव्या संधींचा लाभ घ्यावा, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रोजगारनिर्मिती व शेतकरी विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.कार्यक्रमास केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया,अनुप्रिया पटेल, प्रतापराव जाधव, हरदीपसिंग पुरी, अभिनेत्री भूमी पेडणेकर, स्मृती इराणी आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराबद्दल माजी आ. भीमराव धोंडे यांचे बीड जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.