व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

समाधी सोहळ्याच्या निमित्ताने सदगुरु सेवेकरी मंडळाच्या वतीने मच्छिंद्रनाथ गडावर महाप्रसादाचे आयोजन

भक्तांनी लाभ घ्यावा

0

सचिन रानडे आष्टी
आष्टी-सालाबादप्रमाणे याही वर्षी साजरा होणारा मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी सोहळ्या निमित्त आष्टी येथील श्री सद्गुरू सेवेकरी मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती सेवेकरी मंडळाच्या सदस्यांनी दिली आहे.
नवनाथांपैकी आद्यनाथ समजल्या जाणाऱ्या चैतन्य मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी तालुक्यातील श्रीक्षेत्र सावरगाव (मायंबा) येथे आहे.गर्भगिरी डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावाला मोठा अध्यात्मिक वारसा लाभलेला आहे. मच्छिंद्रनाथांनी येथे संजीवन समाधी घेतलेली असून वर्षातून फक्त एकच दिवस गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे फाल्गुन वद्य अमावास्येला रात्री या समाधीवरील भरजरी भगवे वस्त्र बाजूला काढून समाधीला मंगलस्नान घालून महापूजा केली जाते.
यावर्षी मंगळवारी दि.२१ रोजी सूर्यास्त ते गुढीपाडव्याच्या म्हणजेच बुधवारच्या सूर्योदयापर्यंत दि.२२ रोजी हा सोहळा चालणार आहे.यानिमित्त
श्री सद्गुरू सेवेकरी मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणावर समाधी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.यंदाही या मंडळाच्या वतीने सुमारे 1200 किलो तांदळाचा जिरा राईस तसेच त्या बरोबर सांबर,बुंदी,थंडगार मठा व येणाऱ्या प्रत्येकाला पिण्याच्या पाण्याची बॉटल दिली जाणार आहे.वर्षातून एकदा होणारे मच्छिंद्रनाथ समाधी दर्शन सोहळ्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो नाथ भक्तांची मांदियाळी असते.याही वर्षी हा आकडा 10 लाखांहून अधिक असण्याची शक्यता आहे.श्री सद्गुरू सेवेकरी मंडळाच्या तब्बल 150 हून अधिक तरुण या महाप्रसादाचे वाटप करण्यासाठी मंगळवार दुपारपासून गडावर उपस्थित असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.